Join us

वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:36 IST

Sunny deol: सनी देओल जॉइंट फॅमिलीमध्ये रहायचा. यात धर्मेंद्र कायम शुटिंगमध्ये बिझी असायचे त्यामुळे त्यांची आणि मुलांची भेट फार कमी व्हायची.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol) याच्या 'गदर' या सिनेमाचा तब्बल १७ वर्षानंतर रिमेक आला. विशेष म्हणजे या सिनेमातही दमदार अभिनय करत सनीने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. त्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात अनेकदा सनीने त्याच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यावरही भाष्य केलं आहे. अलिकडेच त्याने आणि बॉबी देओलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या कुटुंबियाविषयी एक खुलासा केला आहे. 'ज्यावेळी वडील घरी नसायचे त्यावेळी नातेवाईक मला मारायचे', असा खुलास सनीने केला आहे.

अलिकडेच सनी आणि बॉबीने कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या कुटुंबियांविषयी बरेच खुलासे केले. या कार्यक्रमात बोलत असतांना जॉइंट फॅमिलीमध्ये राहिल्यामुळे त्याच्यासोबत कुटुंबियांचं वागणं कसं होतं हे त्याने सांगितलं.

या शोमध्ये कपिलने सनीला त्याच्या पॅरेंटिंग स्टाइलविषयी काही प्रश्न विचारले. यावेळी सनीने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. 'सनी आणि बॉबीपैकी कडक शिस्तीचे वडील कोण आहेत?' असा प्रश्न कपिलने विचारला. त्यावर, बॉबीने सनीचं नाव घेतलं. यावेळी सनीने त्याची बाजू मांडली.सोबतच त्याच्या बालपणीचा अनुभव सुद्धा शेअर केला. 

"मला नाही असं वाटत. आमचे वडील नक्कीच शिस्तीचे होते. आम्ही सुद्धा काही प्रमाणात शिस्तबद्ध नक्कीच आहोत. पण, आमचे वडील शुटिंगमध्ये इतकी बिझी असायचे की लहानपणी फार कमी वेळा ते आमच्यासोबत असायचे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त काका-काकूसोबत जॉइंट फॅमिलीमध्येच रहायचो. त्यामुळे त्यांच्यासोबत आमचं नातं जास्त स्ट्राँग झालं होतं. पण, घरात असा एकही व्यक्ती नव्हता ज्याने मला मारलं नसेल", असं सनी देओल म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आई सुद्धा मला खूप मारायची. चप्पलने सुद्धा तिने मारलंय. अगदी रक्त येईपर्यंत मी मार खाल्लाय." दरम्यान, सनी देओल लवकरच राजकुमार संतोषीच्या 'लाहोर 1947' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खान करत आहे. तर बॉबी देओल कंगुवा या तामिळ सिनेमात झळकणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसनी देओलबॉबी देओलधमेंद्रसिनेमा