बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी लॉरेन्स बिश्नोई गँगने आपल्या जुन्या कार्यपद्धतीत (मोडस ऑपरेंडी) मोठा बदल केला आहे, ज्याचा थेट परिणाम तपासावर होत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी शुभम लोणकर याने शूटरला कडक सूचना दिली होती की, त्याने आपला मोबाईल फोन पूर्णपणे बंद ठेवावा. यामुळेच गोळीबाराच्या वेळीच नव्हे, तर घटनेनंतरही शूटरने आपला मोबाईल सुरू केला नाही. याचा परिणाम असा झाला की, क्राईम ब्रांचने सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याची ओळख तर पटवली, पण चार दिवस उलटूनही त्याचे लोकेशन ट्रेस होऊ शकलेले नाही. मोबाईल बंद असल्यामुळे तांत्रिक पाळत ठेवणं अशक्य झालं असून शूटरपर्यंत पोहोचणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.
सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
आरोपी परराज्यात पसार झाल्याचा संशय
तपास यंत्रणांना संशय आहे की, आरोपी शूटर मुंबई सोडून दुसऱ्या राज्यात पसार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी क्राईम ब्रांचची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली असून ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. यापूर्वी सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने मोबाईल टावर डंप आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पकडलं होतं. त्या दोन्ही प्रकरणांत आरोपी घटनेपूर्वी आणि नंतर सतत आपल्या हँडलरच्या संपर्कात होते, हीच त्यांची मोठी चूक ठरली होती. हीच चूक टाळण्यासाठी शुभम लोणकरने रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले होते.
स्कूटी नंबरवरून ओळख पटली
पोलिसांनी घटनेत वापरलेल्या स्कूटीच्या नंबरवरून लॉजिस्टिक सपोर्ट देणाऱ्या आरोपींपर्यंत वेगाने धाव घेतली, मात्र मुख्य शूटर अजूनही फरार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेले चारही आरोपी तेच आहेत, जे बाबा सिद्दीकी हत्याकांडातील ‘प्लॅन-बी’ मध्ये सामील असलेल्या गौरव अपुणे, आदित्य गुडनकर आणि रफीक शेख यांचे जवळचे मानले जातात.
मध्यरात्री थरार! गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबाबत मिळाली मोठी माहिती
पुणे कनेक्शन आणि क्राईम ब्रांचचा तपास
तपासात असंही समोर आलं आहे की, हे सर्व आरोपी शुभम लोणकरला बालपणापासून ओळखत होते, कारण तो देखील पुण्याच्या कर्वेनगर भागातील रहिवासी आहे. लोणकरनेच या सर्वांना तयार केलं होतं आणि त्यापैकी समर्थ पोमाजी हा सतत त्याच्या संपर्कात होता. सध्या मुंबई क्राईम ब्रांच या नेटवर्कमधील दुवे जोडण्यात व्यस्त असून मुख्य शूटरचा शोध घेतला जात आहे.
Web Summary : Rohit Shetty's house firing investigation reveals Lawrence Bishnoi gang's new tactics. Shooters avoided phone use, hindering location tracing. Suspects likely fled Mumbai; Pune connections investigated. Police are actively searching for the shooter.
Web Summary : रोहित शेट्टी के घर पर हुई फायरिंग की जांच में लॉरेंस बिश्नोई गिरोह की नई रणनीति सामने आई। शूटरों ने फोन का इस्तेमाल नहीं किया, जिससे लोकेशन ट्रेसिंग में बाधा आ रही है। संदिग्धों के मुंबई से भागने की आशंका; पुणे कनेक्शन की जांच की जा रही है। पुलिस शूटर की तलाश कर रही है।