Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! 'मला त्याने ठेवले होते नजर कैदेत', कंगना राणौतने ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 13:15 IST

कंगना राणौतने तिला स्ट्रगलिंग काळात ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. ड्रग्ज अँगेल समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सुशांतच्या निधनापासून घराणेशाही आणि गटबाजी विरोधात बंड पुकारणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. तिने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिला स्ट्रगलिंग काळात ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत आणि बॉलिवूडमधील ड्रग्ज पार्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

कंगना राणौतने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वयाच्या 16व्या वर्षी मी मनाली सोडले. चंदीगढला एका स्पर्धेत जिंकले. त्यानंतर एजेंसीने मला मुंबईला पाठवले. त्यानंतर काही दिवस हॉस्टेलमध्ये राहिले. कालांतराने मुंबईत आंटीसोबत राहू लागले. त्याच दरम्यान चित्रपटांमध्ये काम करणारा कॅरक्टर अॅक्टर माझा फ्रेंड झाला आणि मला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे वचन दिले होते. त्याने मला इतके इंप्रेस केले की तो माझा स्वतःहून मेंटॉर झाला आणि आम्ही तिघे एकत्र राहू लागलो.

पुढे कंगना म्हणाली की, कालांतराने गोष्टी बदलू लागल्या. तो आंटीसोबत भांडू लागला आणि त्यांना घर सोडून जाण्यास सांगितले. पण त्याने माझे सामान घरात ठेवले आणि मला कैद केले. मी काहीही केले तरी त्याचा स्टाफ त्याला इत्यंभूत माहिती त्याला देत होते. जणू काही मला घरात कैद केले होते.

तो मला पार्ट्यांमध्ये घेऊन जायचा आणि एकदा मला नशेत असल्यासारखे वाटले आणि त्यामुळे आमच्यात जवळीक वाढली. तेव्हा माझ्या लक्षात आले की हे स्वतःहून वाटले नाही तर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले आहे. त्या घटनेनंतर आठवड्याभरात तो स्वतःला माझा नवरा समजू लागला. जेव्हा त्याला मी म्हटलं की तू माझा बॉयफ्रेंड नाही. तो मला चप्पलाने मारायचा, असे कंगनाने या मुलाखतीत सांगितले.

त्यानंतर तिने सांगितले की, तो मला दुबईला मीटिंगसाठी घेऊन जायचा. तिथे मला वृद्धासोबत बसवायचा आणि स्वतः मीटिंग सोडून निघून जायचा. ते माझा नंबर घ्यायचे. ते माझा दुबईत सप्लाय करतील, अशी भीती मला वाटू लागली होती. कंगनाला चित्रपट मिळाल्यावर त्या व्यक्तीला धक्का बसला. कंगनाला 2006 साली गँगस्टर चित्रपटातून ब्रेक मिळाला. याबद्दल ती म्हणाली की, मला जेव्हा चित्रपटात काम मिळाले तेव्हा तो चिडला. ड्रिंक केल्यानंतर मला सांगायचा की मला अपेक्षा नव्हती की तूला इतक्या लवकर ब्रेक मिळेल. मला तो इंजेक्शन देऊ लागला ज्यामुळे मी शूटला जाऊ शकत नव्हते. मी माझा दिग्दर्शक अनुराग बासूला याबद्दल सांगितले. त्याने मारलेल्या जखमा होत्या. अनुरागने त्याच्या ऑफिसमध्ये राहायला सांगितले. तिथे बऱ्याच रात्री मी राहिले. त्याने मला त्यातून वाचवले.

'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत ड्रग्सच्या आहारी असणाऱ्या कुटुंबातून आलेला नाही. तो एका सामान्य कुटुंबातील होता. रियासोबत रिलेशनशीप पूर्वी त्याला कोणताच मानसिक आजार नव्हता. मानसिक आजाराच्या कटाची सुरूवात युरोप ट्रीपदरम्यान सुरू झाली.

टॅग्स :कंगना राणौतसुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीगुन्हा अन्वेषण विभाग