Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीला मिळाला महाराष्ट्र राज्याचा 'हा' पुरस्कार, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 14:15 IST

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावरून मानले आभार

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अभिनय, फिटनेस या गोष्टींसाठी ओळखली जाते. नुकतंच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' सीरिजमध्ये ती झळकली. शिल्पाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तिने आता चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. महाराष्ट्र राज्याने तिला एका पुरस्काराने सम्मानित केले आहे. याबद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे. 

मनोरंजनक्षेत्रातील योगदानाबद्दल बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' ने गौरविण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक, पदक प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि न्यायमूर्ती सुधा द्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्पा शेट्टीसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण होता असं तिने म्हटलं आहे. तिने सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले,'भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. तसंच मला माझ्या कामाचाही गर्व आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं जे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.'

शिल्पा शेट्टीने या सोहळ्यासाठी हिरव्या रंगाची एब्रॉयडरी साडी नेसली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तसेच तिने अगदी कमी मेकअप केला होता. आपल्या एथनिक लूकने तिने चाहत्यांचं मन जिंकलं.

चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कार गांधीवादी मू्ल्ये, समाजसेवा आणि सामाजिक विकासात हातभार लावण्यासाठी दिला जातो. 2011 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली. बॉलिवूडमधून करण जोहर,मनोज वाजपेयी, क्रिती सेनन, सोनू सूदसह इतरही काही जणांना या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीमहाराष्ट्रबॉलिवूडसोशल मीडिया