Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; 'त्या' प्रश्नावर भडकली शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:32 IST

Shilpa shetty: ६२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राजला जामीन मिळाला आहे. मात्र, अद्यापही त्याची चर्चा थांबलेली नाही. सोशल मीडियावर सातत्याने तो चर्चेत येत आहे.

ठळक मुद्देतिच्या बोलण्याच्या शैलीवरुन राजविषयी विचारलेला प्रश्न तिला न आवडल्याचं दिसून आलं.

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास ६२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राजला जामीन मिळाला आहे. मात्र, अद्यापही त्याची चर्चा थांबलेली नाही. सोशल मीडियावर सातत्याने तो चर्चेत येत आहे. यामध्येच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राज कुंद्राविषयी विचारलेला प्रश्न ऐकल्यानंतर शिल्पा रागाने लाल झाल्याचं पाहायला मिळालं.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शिल्पाचा व्हिडीओ जुना असून यात राज कुंद्राविषयी प्रश्न विचारल्यानंतर तिला संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर तिने पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही देण्याचं टाळलं.

माझी तुझी रेशीमगाठ: 'अपने पास बहोत पैसा है' म्हणत मायलेकीने केलं क्यूट फोटोशूट

मी राज कुंद्रा आहे? का मी त्याच्यासारखी दिसते? नाही..नाही मी नेमकी कोण आहे?, असा प्रतिसवाल तिने विचारला. यावेळी ती हसत होती. मात्र, तिच्या बोलण्याच्या शैलीवरुन आणि एकंदरीतच तिचा मूड पाहात राजविषयी विचारलेला प्रश्न तिला न आवडल्याचं दिसून आलं.

चित्रपटासाठी वजन वाढवणं कंगनाला पडलं महागात; निर्माण झाल्या शारीरिक समस्या

"मला असं वाटतं की एक सेलेब्रिटी असल्या कारणाने ना तर मी कधी कोणती तक्रार करावी किंवा कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं. आणि, हीच माझ्या आयुष्याची फिलॉसॉफी आहे."

दरम्यान, राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राजला अटक झाल्यानंतर शिल्पाने स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं. परंतु, काही दिवस उलटल्यानंतर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा काम सुरु करत असल्याचं तिने जाहीर केलं होतं. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्राबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमापत्रकार