माझी तुझी रेशीमगाठ: 'अपने पास बहोत पैसा है' म्हणत मायलेकीने केलं क्यूट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:32 AM2021-09-27T11:32:03+5:302021-09-27T11:35:49+5:30

tuzi mazi reshimgath: या फोटोमध्ये मायरा आणि प्रार्थनाने सेम व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे.

या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत मायरा वायकुळ ही बालकलाकारही झळत आहे. विशेष म्हणजे ही मायरा प्रेक्षकांची लाडकी ठरत असून तिची प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर स्टेवरही प्रत्येकाची लाडकी आहे. त्यामुळेच श्रेयस किंवा प्रार्थना तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

अलिकडेच प्रार्थनाने 'डॉटर्स डे'च्या निमित्ताने मायरासोबत खास फोटोशूट केलं आहे. या दोघी मायलेकींनी सेम लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

ऑनस्क्रीन मायलेकी असलेल्या या दोघींनी सेम कपडे परिधान करुन केलेलं हे फोटोशूट प्रेक्षकांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळे सोशल मीडयावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या फोटोमध्ये मायरा आणि प्रार्थनाने सेम व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. या टी-शर्टवर मालिकेतील परी आणि नेहाचा स्पेशल डायलॉग 'अपने पास बहोत पैसा है' असं लिहिलेलं आहे.

प्रार्थना आणि श्रेयशने खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ही मालिका मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. या कलाकरांच्या अभिनयासोबत मायराचा गोड अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.