Join us
Daily Top 2Weekly Top 5

"भररस्त्यात त्याने छेड काढली बाकीचे पाहत राहिले" शेफाली शाहने सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:28 IST

शेफाली शाहलाही आला होता धक्कादायक अनुभव

बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री म्हणून शेफाली शाह (Shefali Shah) कडे पाहिलं जातं.'दिल्ली क्राईम' वेबसिरीजमध्ये साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून तिने सर्वांचंच लक्ष वेधलं. तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं शिवाय तिला अनेक पुरस्कारही मिळाले. नुकतंच तिला इंटरनॅशनल एमी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं. दरम्यान तिने एका मुलाखतीत लहानपणी आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला.

शेफाली शाह देखील लहानपणी विनयभंगाची शिकार झाली आहे. रस्त्यावर तिला भरदिवसा छेडण्यात आलं आणि बघणाऱ्यांनी काहीच केलं नाही. शेफाली म्हणाली,'मला असं वाटतं अनेक मुलींनी एकदा तरी अशा गोष्टींचा सामना केला असेल. मला आठवतंय मी छोटी होते तेव्हा एकदा बाजारात आणि शाळेतून परत येताना मी अशा अनुभवाला सामोरी गेली आहे. पण मी काहीच करु शकले नाही जेव्हा एकाने माझी छेड काढली. मी खूप छोटी होते आणि घाबरले होते. तेव्हा आजूबाजूला असणारे लोक फक्त बघत बसले. म्हणजे इतकी गर्दी असूनही काहीच उपयोग नव्हता.'

ती पुढे म्हणाली,'मुली तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा मुलांना चांगले संस्कार मिळतील. मी सेलिब्रिटी असो किंवा नसो, मला विश्वास आहे की  जर मुलांना योग्य संस्कार दिले तर मुली सुरक्षित राहतील. मला दोन मुलं आहेत. त्यांना योग्य प्रकारे वाढवणं माझी जबाबदारी आहे. आम्ही मुलींच्या सुरक्षेबाबत बोलतच नाही. मी नेहमीच मुलांना सांगते तुमची स्वत:कडून जी अपेक्षा आहे तसंच तुम्ही दुसऱ्यांशी वागा.'

शेफालीबद्दल सांगायचं तर तिचा जन्म १९७३ मध्ये मुंबईत शेट्टी कुटुंबात  झाला. तिचे वडील रिझर्व्ह बँकेत होते. तर आई डॉक्टर. शेफाली भरतनाट्यममध्ये पारंगत आहे. गुजराती स्टेज शोपासून तिने करिअरला सुरुवात केली. 2000 साली तिने विपुल शाहशी लग्नगाठ बांधली.

टॅग्स :विनयभंगबॉलिवूडगुन्हेगारी