Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल, 'डंकी'च्या रिलीजआधी घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:51 IST

शाहरुख खान लेक सुहाना खानसह नुकताच शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला पोहोचला आहे.

अभिनेता शाहरुख खान (Sharukh Khan) सध्या आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाकडून शाहरुखला आणि त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. कारण हा सिनेमा हिट ठरला तर २०२३ या वर्षातला शाहरुखचा हा सलग तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल. शाहरुखने पहिल्यांदाच या सिनेमातून राजकुमार हिरानींच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख डंकी च्या यशासाठी वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचला होतो. तर आता किंग खान साईबाबांच्या चरणी लीन झाला आहे. 

शाहरुख खान लेक सुहाना खानसह नुकताच शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला पोहोचला आहे. शिर्डी विमानतळावरील शाहरुखचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एएनआयने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये शाहरुख पांढरा शर्ट,जॅकेट, टोपी आणि गळ्यात माळ घालून आलेला दिसत आहे. त्याच्यासोबत लेक सुहाना आणि मॅनेजर पूजा ददलानीही आहे. शाहरुखला दाखल होताच जमलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केलेला पाहायला मिळतोय.

शाहरुखने याआधीही 'पठाण' आणि 'जवान' सिनेमाच्या रिलीजपूर्वी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. आता डंकीच्या रिलीजआधी त्याने शिर्डीच्या साईबाबांचेही दर्शन घेतले. तर त्याची लेक सुहाना खानही तिच्या 'द आर्चीज' या डेब्यू सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. 

'डंकी' २२ डिसेंबरला रिलीज होत असून यामध्ये शाहरुखने हार्डी ही भूमिका साकारली आहे. यासोबतच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांची भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडला असून चाहते रिलीजची वाट बघत आहेत.

टॅग्स :शाहरुख खानशिर्डीसाईबाबा मंदिरडंकी' चित्रपटबॉलिवूडसुहाना खान