बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'किंग' सिनेमाची वाट पाहत आहेत. या सिनेमातील शाहरुखचा पहिला लूकही काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ग्रे हेअर, बिअर्ड लूकमध्ये तो भाव खाऊन गेला. सिनेमात शाहरुखची आवडती अभिनेत्री दीपिका पादुकोणचीही भूमिका असणार आहे. आतापर्यंत दोघांनी बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. दरम्यान 'किंग' सिनेमातलं दोघांचं एक गाणं अचानक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात दोघांचा किसींग सीन, रोमँटिक सीक्वेन्सही दिसतोय. हे गाणं खरंच सिनेमातलं आहे की फेक आहे? यामागचं सत्य वाचा
एक्सवर सध्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचं एक गाणं व्हायरल होतंय. 'मै बहक गया'असे गाण्याचे बोल आहेत . यात शाहरुखचा हुबेहूब 'किंग'मधलाच लूक दिसतोय. तर दीपिका हिरव्या साडीत दिसत आहे. तर कधी लाल गाऊनमध्येही तिचा लूक आहे. एका सीनमध्ये दोघांचा किसींग सीनही दिसत आहे. 'किंग'चं गाणं कधी रिलीज झालं? असाच प्रश्न चाहत्यांनाही पडला.
मात्र हा व्हिडीओ एआयने बनवला असल्याचं समोर आलं आहे. काही चाहत्यांनीच एआय वापरून व्हिडीओ तयार केला आहे. किंग मधलं अद्याप एकही गाणं प्रदर्शित झालेलं नाही. तसेच कोणतेही सीन्स समोर आलेले नाहीत. दीपिकाचा लूकही अद्याप आऊट झालेला नाही.
'किंग' पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सिनेमात शाहरुखची लेक सुहाना खानही मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख लेकीला वैयक्तिकरित्या अॅक्शनचे धडे देत आहे. शिवाय सिनेमात अभय वर्मा, अभिषेक बच्चन यांचीही भूमिका आहे.