Join us

शाहरुखने पाण्याची बॉटल हातात घेतली आणि केलं असं काही की दीपिका पादुकोण पाहतच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:15 IST

Waves Summit 2025 मध्ये काल शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण सहभागी झाले होते. यावेळी शाहरुखने पाण्याची बॉटल हातात घेऊन काय केलं, तुम्हीच बघा (shahrukh khan)

काल मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे Waves Summit 2025 चा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या शानदार सोहळ्याचं उद्धाटन झालं. Waves Summit 2025 मध्ये शाहरुख खान, रणबीर कपूर, आमिर खान, दीपिका पादुकोण, आलिया भट या बॉलिूवड सेलिब्रिटींसह रजनीकांत, मोहनलाल,  चिरंजीवी हे साउथ सुपरस्टारही सहभागी झाले होते. यावेळी  The Journey: From Outsider to Ruler moderated  या खास सेशनमध्ये शाहरुख आणि दीपिका सहभागी झाले होते. त्यावेळी शाहरुखने समोर असलेल्या पाण्याच्या बॉटलसोबत असं काही केलं,  की दीपिका पाहतच राहिली.

शाहरुखने पाण्याची बॉटल घेतली अन्...

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी मुंबईतील जिओ कन्वेशन सेंटर येथे Waves Summit 2025 मध्ये सहभाग घेतला. यावेळी पॅनल डिस्कशनमध्ये शाहरुखला मजेदार टास्क मिळाला. शाहरुखला समोर असलेल्या पाण्याच्या बॉटलसोबत रोमान्स करायचा होता. त्यावेळी शाहरुखने पाण्याची बॉटल हातात घेऊन त्याच्या 'जब तक है जान' सिनेमातील लोकप्रिय संवाद म्हटला. “तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां, नहीं भूलूंगा मैं… जब तक है जान।”

शाहरुख हे म्हणत असताना दीपिका त्याच्या बाजूलाच बसली. शाहरुखचा असा अंदाज बघून ती खळखळून हसली. यावेळी करण जोहरनेही मजेशीर टिप्पणी केली. तो म्हणाला की, "या बॉटलने आताच बाळांना जन्म दिला आहे", असं ऐकताच सर्वजण हसले. यावेळी शाहरुख दीपिका पादुकोणला उद्देशून म्हणाला की, "एक गोष्ट थोडी वैयक्तिक आहे. मी मर्यादा ओलांडत असेल तर मला माफ करा. पण मला असं वाटतं, दीपिका तिची सर्वात चांगली भूमिका निभावणार आहे ती म्हणजे आईची. तिची लेक दुआसोबत. मला विश्वास आहे की, दीपिका एक उत्तम आई बनेल."

टॅग्स :शाहरुख खानदीपिका पादुकोणकरण जोहरबॉलिवूड