Sara Arjun On Ranveer Singh: बॉलिवूडसह संपूर्ण जगभरात आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर- २ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. या चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील सारा अर्जुनचीरणवीर सिंगबरोबरची केमिस्ट्री देखील चर्चेचा विषय ठरली. यामध्ये यालिनाची भूमिका साकारून अभिनेत्री सारा अर्जुन चांगलाच भाव खाऊन गेली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली.
सध्या सारा अर्जुन' धुरंधर-२' चं यश अनुभवते आहे. या चित्रपटानंतर साराकडे बिग बजेट प्रोडजेक्ट्सची रांग लागल्याचं पाहायला मिळतंय.दरम्यान, अलिकडेच सारा अर्जुनने एका मुलाखतीत या चित्रपटात रणवीर सिंगसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.'फेमिना इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणवीरचं कौतुक करत ती म्हणाली, “सह-अभिनेता म्हणून रणवीर सिंगची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की हा केवळ त्यांचा चित्रपट नाही, तर तो प्रत्येकाचा आहे."
यानंतर साराने सांगितलं,"सेटवर ते प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत खूप साधेपणाने वागतात. त्यांनी कधीही इतरांवर वर्चस्व गाजवलं नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करताना सगळ्यांना खूप छान वाटतं."
रणवीरच्या कामाबद्दल अभिनेत्री म्हणाली...
"एक कलाकार म्हणून रणवीर सिंग ज्या प्रकारचं काम करतात, ते पाहून मी थक्क होते.त्याचं कामाप्रती असलेलं समर्पण खूप प्रेरणादायी आहे. ते आपल्या प्रत्येक सीनसाठी पूर्ण मेहनत घेतात आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी यासाठी प्रयत्न करतात." त्याच्या या मेहनतीमुळे आणि ऊर्जा पाहून ती स्वतःही प्रभावित झाल्याचं साराने सांगितलं.
Web Summary : Sara Arjun praises Ranveer Singh's humility and dedication on the 'Dhurandhar 2' set. She highlights his respectful treatment of all cast and crew, emphasizing his inspiring work ethic and commitment to perfection.
Web Summary : सारा अर्जुन ने 'धुरंधर 2' के सेट पर रणवीर सिंह की विनम्रता और समर्पण की सराहना की। उन्होंने सभी कलाकारों और क्रू के प्रति उनके सम्मानजनक व्यवहार पर जोर दिया, उनकी प्रेरणादायक कार्य नीति और पूर्णता के प्रति प्रतिबद्धता पर प्रकाश डाला।