Join us

'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:33 IST

रश्मिका सलमानला त्याचेच फेमस डायलॉग्स तेलुगूमध्ये म्हणायला सांगत आहे. सलमान-रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खळखळून हसत आहेत.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तर ताज्या माहितीनुसार या सिनेमात नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली सर्वांचीच लाडकी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकणार आहे. याचा अर्थ सलमान आणि रश्मिकाची फ्रेश जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पण हे दोघं याआधीही एकत्र दिसले आहेत. त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही चांगलंच हसू येईल.

रश्मिका मंदाना दक्षिणेतील सुपरस्टार आहे. 2022 मध्ये तिने 'गुडबाय' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'मिशन मजनू', 'अॅनिमल' असे हिंदी सिनेमे केल्यानंतर ती आता थेट सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ए आर मुरुगदास यांच्या दिग्दर्शनाखाली 'सिकंदर' सिनेमात तिची वर्णी लागली आहे.यानिमित्ताने सलमान आणि रश्मिकाचा एक जुना व्हायरल होतोय. यामध्ये रश्मिका सलमानसमोर त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. तसंच सलमानने तिच्यासोबत साऊथमध्ये काम करावं असंही ती बोलत आहे. तर सलमान तिला बॉलिवूडमध्ये काम करु असं म्हणत आहे. यावेळी रश्मिकासोबत नीना गुप्ताही आहेत. नंतर रश्मिका सलमानला त्याचेच फेमस डायलॉग्स तेलुगूमध्ये म्हणायला सांगत आहे. सलमान-रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खळखळून हसत आहेत.

हा व्हिडिओ बिग बॉस सेटवरचा असल्याचं दिसत आहे. रश्मिका आणि नीना गुप्ता 'गुडबाय' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिथे आलेल्या आहेत. या दोघांना आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर 'सिकंदर रिलीज होणार आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया