Join us

Richa Chadda : रिचाचे नवे ट्विट म्हणजे भारतीय सैनिकांचा अपमान, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:02 IST

अभिनेत्री रिचा चड्डाने भारतीय सैन्याविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडुन नाराजी दर्शवण्यात आली आहे.हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे.

Richa Chadda : अभिनेत्री रिचा चड्डानेभारतीय सैन्याविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडुन नाराजी दर्शवण्यात आली आहे. हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे.

भारतीय सेनेचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. लेफ्टिनंट जनरल म्हणाले, 'जर सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.' यावर रिच्चाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केले, 'Galwan says hi ''गलवान हाय म्हणत आहे'.

बीजेपी नेता मंजिंदर सिंह यांनी रिचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई पोलिसांना केली आहे. रिचाचे विचार हे भारतविरोधी आहेत. ती राहुल गांधींची समर्थक आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

१ मे २०२० रोजी गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली होती. यात भारताचे २० सैनिक शहीद झाले. चीनचे ३५ ते ४० सैनिक मारले गेले. हा आकडा चीनने लपवलाही होता. यानंतर आजपर्यंत भारत आणि चीनचे संबंध बिघडले.

टॅग्स :रिचा चड्डाट्विटरभारतीय जवानभारतपीओके