Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीचे ट्रॅव्हल डीटेल्स उघड, एका महिन्यात ७ वेळा गेली होती परदेशात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:11 IST

टाइम्स नाउच्या हाती रियाचे हे ट्रॅव्हल डीटेल्स लागले आहेत. ज्यातून समोर आले की, १० ऑगस्ट २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान रिया कोणकोणत्या देशात गेली होती

सुशांत सिंह  राजपूतच्या केसमध्ये चौकशी दरम्यान रिया चक्रवर्तीचे ट्रॅव्हल डीटेल्स समोर आले आहेत. यातून गेल्या ७ महिन्यात तिने अनेक विदेश यात्रा केल्याचे समजते. इतकेच नाही तर ती नेहमीच गोवा-महाराष्ट्राच्या ट्रिपवर जात होती. या रिपोर्टमध्ये असंही दिसतं की रिया एका महिन्यात ७ वेळा परदेशात गेली होती.

टाइम्स नाउच्या हाती रियाचे हे ट्रॅव्हल डीटेल्स लागले आहेत. ज्यातून समोर आले की, १० ऑगस्ट २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान रिया कोणकोणत्या देशात गेली होती. या रिपोर्टमधून अशीही माहिती समोर आली की, रियाच्या या फॉरेन टूरमध्ये फ्रान्स, ऑस्ट्रिया, यूएई आणि स्वित्झर्लॅंड देशांचा समावेश आहे. टाइम्स नाउच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, रिया एका महिन्यात ७ देशांमध्ये गेली होती.

खर्चाने परेशान झाला होता सुशांत

सुशांतच्या परिवाराने असा दावा केला आहे की, त्याच्या लाईफमध्ये रिया आल्यापासून त्याचा खर्च वाढला होता. परिवाराने दावा केला आहे की, सुशांत स्वत: या वेगवेगळ्या खर्चांमुळे चिंतेत राहत होता. असेही सांगितले जाते की, सुशांतने त्याच्या मॅनेजरला याबाबत चौकशी करण्यासही सांगितले होते.

टॅक्स, ट्रॅव्हल आणि इतर पेमेंट

रिपोर्टनुसार, ईडीा माहिती मिळाली आहे की, गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सुशांतच्या अकाउंटमध्ये १५ कोटी रूपये होते. ज्यातून टॅक्स, ट्रॅव्हल आणि इतर गोष्टींचे पेमेंट्स केले गेले. ईडीच्या चौकशीत श्रुति मोदीने सांगितले की, रिया चक्रवर्ती गेल्या काही काळापासून सुशांतचे सर्व फायनॅन्शिअल आणि प्रोफेशनल निर्णय घेत होती.

यूरोप ट्रिपवर बिघडली सुशांतची स्थिती

काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, जेव्हा ती सुशांतसोबत यूरोप ट्रिपवर गेली होती तेव्हा त्याची तब्येत बिघडली होती. रियाने धक्कादायक माहिती दिली होती की, ते इटलीच्या एका जुन्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील भींतींवरील काही पेंटिंग पाहून सुशांत विचित्र वागू लागला होता.

रियाने सांगितली होती पेंटिंगची कहाणी

रियाने सांगितले की, हॉटेलमधील एका पेंटिंगमध्ये राक्षस आपल्याच बाळाला खाताना दाखवला आहे. ही पेंटिंग पाहून सुशांत विचित्र वागायला लागला होता. यावेळी रिया आणि शौविक वेगळ्या रूममध्ये होते. जेव्हा ती परतली तेव्हा सुशांत रूद्राक्षाची माळ घेऊ मंत्राचा जप करत बसला होता आणि तो फार घाबरलेलाही दिसत होता. रियाने सांगितले की, सुशांतला पेंटिंगमधील कॅरेक्टर दिसत होते. पण तो ठिकपणे याबाबत काही सांगू शकत नव्हता.

हॉटेल ते प्रायव्हेट जेट...; रिया चक्रवर्तीला खरेदी करायच्या होत्या या गोष्टी

यूरोप ट्रिपवर 'ही' पेंटिंग पाहून बदलली होती सुशांतची वागणूक, रियाने केला आश्चर्यकारक दावा!

AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड