Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:01 AM2020-08-12T10:01:10+5:302020-08-12T10:46:50+5:30

Sushant Singh Rajput Case :रिया चक्रवर्तीने AU नावाच्या व्यक्तीला तब्बल ६३ कॉल्स केले होते. त्यामुळे ही व्यक्ती कोण? रियाने तिला इतके कॉल्स का केलेत? असे अनेक प्रश्न समोर आले होते. तसेच ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे.

Sushant Singh Rajput Case : 63 calls have been made between Rhea Chakraborty and AU | Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

googlenewsNext

बॉलिवू़ड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज या केसला नवीन वळण मिळत आहे. अशात रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू असून त्यातूनही नवे खुलासे होत आहेत. अशीच एक रियाच्या कॉलॉ डिटेल्ससंबंधी नवीन अपडेट समोर आली  आहे. 
सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने AU नावाच्या व्यक्तीला तब्बल ६३ कॉल्स केले होते. त्यामुळे ही व्यक्ती कोण? रियाने तिला इतके कॉल्स का केलेत? असे अनेक प्रश्न समोर आले होते. तसेच ही बाब संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहे AU?

दरम्यान, रियाच्या टीमने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. टीमकडून सांगण्यात आले आहे की, ज्या AU चा उल्लेख होतो आहे. ती रियाची फॅमिली फ्रेन्ड अनन्या उधास आहे. पण आता रिया आणि अनन्यामध्ये इतके कॉल्स का झालेत हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

कोण करणार तपास?

दुसरीकडे सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार की मुंबई पोलीस याबाबत मंगळवारी सुप्रीम कोर्टात चांगलीच चर्चा झाली. याचा निर्णय गुरूवारी येऊ शकतो. सुशांतच्या वडिलांनी पटणामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात फसवणुकीची आणि सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्याची तक्रार दाखल केली होती. पण रियाने मागणी केली आहे की, केस पटणाहून मुंबईला ट्रान्सफर  केली जावी.

काय आहे प्रकरण ?

टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकलेला नाही. अशात सुशांतच्या परिवाराने त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप लावले होते. तिलाच सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. त्यामुळे या केसला नवे वळण लागले आहे. आता या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे खरं काय ते बाहेर येण्याची अपेक्षा केली जात आहे.

हे पण वाचा :

शरीरावर पांढरे डाग पण ते... ! सुशात सिंग राजपूतचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व श्रुती मोदीला केला होता मॅसेज, पण...

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

Web Title: Sushant Singh Rajput Case : 63 calls have been made between Rhea Chakraborty and AU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.