Join us

....म्हणून अनंत-राधिकाच्या संगीत आणि हळदी सोहळ्याला करीना अन् सैफची गैरहजरी; समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 09:31 IST

करीना आणि सैफचं कार्यक्रमात सहभागी न होण्याचं कारण समोर आलं आहे.

Saif Ali Khan and Kareena Kapoor Khan: रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या १२ जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या शाही लग्न सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते आहे. लग्नासाठी मुंबईतील अँटिलिया निवास्थान सजलं आहे. सध्या सोशल मीडियावर या शाही विवाह सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा चालू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये बॉलिवूड कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही हजेरी लावली. मात्र, बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आणि सैफ अली खान ना संगीत सोहळ्यात ना हळदी समारंभात दिसले. मात्र, करीना आणि सैफचं कार्यक्रमात सहभागी न होण्याचं कारण समोर आलं आहे.

सध्या करिना,सैफ आणि तैमूर भारतात नसून ग्रीसमध्ये आहेत. सोशल मीडियावर करीनाने तिचे फोटो शेअर केले आहेत.  तैमूरला जून ते ऑगस्टमध्ये सुट्टी असते. त्यामुळे करीना आणि सैफ हे जुने ते ऑगस्ट दरम्यान काम करत नाहीत. दोघेही आपल्या मुलांना वेळ देतात. या महिन्यात शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ते मुलांना फिरायला घेऊन जातात. हे एका मुलाखतीमध्ये करीनाने सांगितल होते. करीना आणि सैफ हे कुटुंबीयांसोबत बाहेर असल्याकारणाने अनंत-राधिकाच्या कार्यक्रमांत सहभागी झालेले नाहीत. 

करीना आणि सैफ हे अनंत-राधिकाच्या संगीत आणि हळदी समारंभाला जरी उपस्थित राहू शकले नसले. तरी ते या जोडप्याच्या लग्नसोहळ्याला मात्र हजेरी लावू शकतात. कारण, करीनाचं मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांच्या मुलांसोबत खान बॉण्डिंग आहे. यापूर्वी करीना आणि सैफ अनेक वेळा अंबानींच्या कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. करीना कपूर मार्चमध्ये झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला गेली होती. करीनाने प्री-वेडिंगमध्ये परफॉर्मदेखील केलं होतं. त्यामुळे दोघेही लवकरच भारतात परततीलल आणि अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहील अशी शक्यता आहे. 

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना ही लवकरच 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. याशिवाय करीनाचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर सिनेमा आहे. तर याआधी करीना 'लाल सिंह चड्ढा'नंतर 'जाने जान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर सैफ अली खान 'देवारा'च्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात तो ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. 

 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान सेलिब्रिटीबॉलिवूडलग्नअनंत अंबानीमुकेश अंबानीसोशल मीडिया