Join us

रवीना टंडनने लेकीसोबत घेतलं सोमनाथचं दर्शन, 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर भलतेच खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:35 IST

रवीनाने दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

90 च्या दशकातील बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) आता दुसरी इनिंग सुरु झाली आहे. मोठ्या ब्रेकनंतर रवीनाने सिनेसृष्टीत कमबॅक केले. तर दुसरीकडे तिची लेक राशा थडानीही (Rasha Thadani) फिल्मइंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारित आहे. मायलेकीचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. रवीना या वयातही अगदी सुंदर आणि फिट दिसते. तर राशाही सौंदर्याबाबतीत आईवरच गेली आहे. नुकतंच दोघींनी सोमनाथचं ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. रवीनाने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोमनाथ मंदिर परिसराचा आणि दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मायलेकी कपाळावर भस्म लावून घेत आहेत. रवीनाने सुंदर साडी नेसली असून राशाने ड्रेस परिधान केला आहे. दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसून येतोय. रवीनाने कॅप्शनमध्ये संस्कृतातील महामृत्युंजय मंत्र आणि'हर हर महादेव' लिहिले आहे. शिवाय व्हिडिओ आणि फोटो सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या परवानगीनेच घेतल्याचा तिने उल्लेख केला आहे. 

रवीना आणि राशा अनेक ठिकाणी भेटी देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्या मध्य प्रदेशातील पन्ना जंगल सफारीचा आनंद घेऊन आल्या . तोही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मायलेकीचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. 'रवीना लेकीला आपली संस्कृती आणि संस्कारांचा परिचय करुन देत आहे हे पाहून चांगले वाटले' अशी कमेंट एकाने केली आहे. तर चाहत्यांनी त्यांच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.

वर्कफ्रंट

रवीना लवकरच ओटीटीवर पदार्पण करत आहे. हॉटस्टारवर तिची 'कर्मा कॉलिंग' ही सीरिज प्रदर्शित होत आहे. शिवाय ती अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल' सिनेमातही दिसणार आहे. या चित्रपटातून अक्षय आणि रवीना अनेक वर्षांनी एकत्र येत आहेत. तर राशा थडानी साऊथ स्टार रामचरण तेजासोबत डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडगुजरातमंदिरसोशल मीडिया