Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह रडारवर! १० कोटींची खंडणी अन् अमेरिकेतील नंबरवरुन धमकीची व्हॉईस नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:35 IST

Ranveer Singh : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहकडे १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई गँगने १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. बिश्नोई गँगने अभिनेत्याला ज्या नंबरवरून धमकीची व्हॉईस नोट पाठवली होती, तो मेसेज एका अमेरिकन नंबरवरून आला होता. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, क्राईम ब्रांच प्रोटोकॉलनुसार त्या नंबरची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आलं आहे की, सध्या बिश्नोई गँगचा खास हस्तक असलेल्या 'हॅरी बॉक्सर'ने व्हॉईस नोट पाठवून रणवीर सिंहला धमकी दिली आणि १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. क्राईम ब्रांचच्या प्राथमिक तपासात रणवीर सिंहच्या मॅनेजरच्या व्हॉटसएपवर आलेल्या व्हॉईस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र या संबंधित इतर पुरावे गोळा करण्याचे काम क्राईम ब्रांच करत आहे.

१५ लाखांचं आमिष, ५० हजार एडव्हान्स; रोहितच्या घरावरील गोळीबाराच्या मास्टरमाइंडचा मास्टर प्लॅन

सनी, सोनूने केली रेकी, दीपकने झाडल्या गोळ्या; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची इनसाईड स्टोरी

रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सरने ही व्हॉईस नोट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पाठवली होती. रणवीर सिंहला मिळालेली ही धमकी त्याच्या मॅनेजरच्या मोबाईल नंबरवर व्हॉईस नोटद्वारे पाठवण्यात आली होती. या धमकीनंतर रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचने रणवीर सिंहच्या मॅनेजरचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही, मात्र प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

ना लोकेशन, ना कॉलिंग... नवी मोडस ऑपरेंडी; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे फरार

बिश्नोई गँगने बॉलिवूडला केलं टार्गेट

गेल्या अनेक दिवसांपासून बिश्नोई गँग बॉलिवूडला टार्गेट करत आहे. रणवीर सिंहच्या आधी बिश्नोई गँगने सलमान खान, कपिल शर्मा, पवन सिंग आणि रोहित शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. त्यानंतर या सर्व सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रणवीर सिंहने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh on Radar: Extortion Threat from US Number

Web Summary : Ranveer Singh received a ₹10 crore extortion threat from the Bishnoi gang via an American number. Police are investigating, suspecting 'Harry Boxer's' involvement. Security has been increased for the actor. The Bishnoi gang has been targeting Bollywood figures.
टॅग्स :रणवीर सिंगगुन्हेगारीरोहित शेट्टीबॉलिवूडपोलिसमुंबई