Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:42 IST

रणवीर अन् अक्षय खन्नाचा 'धुरंधर' गाजवतोय बॉक्स ऑफिस, ७ दिवसांत मोठी झेप;'जेन- झी' ला वेड लावणाऱ्या 'सैयारा'ला धोबिपछाड

Dhurandhar Box Office Collection Day 7: आदित्य धर यांच्या धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे.'धुरंधर' रीलिज होऊन केवळ ७ दिवस झाले आहेत, आणि या ७ दिवसांत रणवीर सिंह आणि सारा अर्जुनच्या सिनेमाने कमाईचे नवनवीन विक्रम रचले आहेत. हा बहुचर्चित चित्रपट ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला.रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ७ दिवसांत  चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रदर्शनाच्या सात दिवसांत  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला, यावर नजर टाकूयात.

धुरंधर हा सिनेमा २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. रणवीरच्या या सिनेमाने काही दिवसांपूर्वी रीलिज झालेल्या धनुष आणि कृती सेनॉनच्या 'तेरे इश्क मैं' सिनेमाला मागे टाकलं आहे.२०२५ मधील सर्वाधिक चित्रपटांच्या यादीत धुरंधरने आपलं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अवघ्या आठवड्याभरातच 'धुरंधर'ने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सातव्या दिवशी २७ कोटींचा व्यवसाय केला. दरम्यान, या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो.

रणवीर सिंगचा धुरंधर अनेक बिग बजेट चित्रपटांवर भारी पडला आहे.हा चित्रपट रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. इतकंच नाही चित्रपटाने सैयारालाही मागे टाकत सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी तिसरा चित्रपट ठरला आहे. कमाईच्या बाबतीत धुरंधरने सलमानचा सिकंदर तसेच रॉकी और रानी की प्रेम कहाणी,  रेड-२ या चित्रपटांचे रेकॉर्डस मोडले आहेत.

'धुरंधर' सिनेमाचं भारतातील कलेक्शन 

पहिला दिवस  - २८ कोटी

दुसरा दिवस- ३२ कोटी 

तिसरा दिवस- ४३ कोटी

चौथा दिवस- २३.२५ कोटी

पाचवा दिवस-२७ कोटी

सहावा दिवस- २७ कोटी

सातवा दिवस- २७ कोटी 

एकूण कलेक्शन- २०७.२५ कोटी

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा स्पाय थ्रिलर- अँक्शन चित्रपट आहे.या चित्रपटात पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड, दहशतवाद आणि राजकारणाचा रक्तरंजित खेळ दाखवला आहे. यामध्ये रणवीर सिंग,सारा अर्जुन,अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer's 'Dhurandhar' Roars at Box Office: Massive ₹207.25 Crore Haul!

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' dominates the box office, surpassing ₹207.25 crore in just seven days. The action-thriller, directed by Aditya Dhar, features a stellar cast and has broken records, outperforming several big-budget films. It is a major success for Ranveer.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाअक्षय खन्नाबॉलिवूडसिनेमा