'साई बाबा' (Sai Baba) फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती गंभीर असताना, त्यांच्या उपचारासाठी बॉलिवूड कुटुंबातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने दळवी यांच्या कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. पण यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. काय घडलं नेमकं?
रिद्धिमाने केली आर्थिक मदत
सुधीर दळवी यांच्या कुटुंबाने त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, रिद्धिमा कपूर साहनी हिने त्वरित पुढाकार घेतला आमि मदत केली. तिने मदत केल्याची कमेंट करत, सुधीर दळवी लवकर बरे व्हावेत, म्हणून प्रार्थना केली. परंतु यावर रिद्धीमाला ट्रोल व्हावं लागलं आहे. रिद्धिमाने मदत केल्यानंतर काही लोकांनी तिच्यावर टीका केली. मदत केलीस तर सांगितलं कशाला, फुटेज पाहिजे? असा तिच्यावर आरोप. या टीकाकारांना रिद्धिमाने अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.तिने म्हटले, "जीवनात प्रत्येक गोष्ट केवळ दिखाव्यासाठी नसते. एखाद्या गरजू व्यक्तीला, आपल्या क्षमतेनुसार मदत करणे, हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे." रिद्धिमाने ट्रोलर्सना दिलेलं हे उत्तर चर्चेत आहे.
Web Summary : Riddhima Kapoor Sahni faced online criticism for financially assisting ailing actor Sudhir Dalvi. Trolls questioned her motives, accusing her of seeking publicity. She responded, stating that helping those in need is a blessing, not a show.
Web Summary : रिद्धिमा कपूर साहनी ने अभिनेता सुधीर दलवी की आर्थिक मदद की, जिसके बाद उन्हें ट्रोल किया गया। ट्रोलर्स ने उन पर प्रचार पाने का आरोप लगाया। रिद्धिमा ने कहा कि जरूरतमंदों की मदद करना एक आशीर्वाद है, दिखावा नहीं।