Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:06 IST

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे.

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या ऐतिहासिक महाकाव्यावर आधारित चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. या भव्य चित्रपटात आता प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर राघव जुयालची एन्ट्री झाली असून तो रावणाचा पराक्रमी पुत्र 'मेघनाथ'ची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

विशेष म्हणजे या भूमिकेसाठी आधी '१२वी फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सी याच्या नावाची चर्चा होती. मात्र विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तो कधीच या सिनेमाचा हिस्सा नव्हता असं सांगितलं आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी राघव जुयालला निर्मात्यांनी पहिली पसंती दिली आहे. 'किल', 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या चित्रपटातील राघवच्या हटके भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे मेघनाथच्या भूमिकेत राघवला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, यात शंका नाही.

नितेश तिवारी यांचा हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. यात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार यश दिसणार आहे. याशिवाय हनुमान म्हणून सनी देओल आणि लक्ष्मण म्हणून रवी दुबे यांची नावे आधीच निश्चित झाली आहेत. राघव जुयालने साकारलेली मेघनाथची भूमिका चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे.

हा भव्य चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून त्याचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर २०२७ च्या दिवाळीत या महाकाव्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याचे नियोजन निर्मात्यांनी केले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे संगीत ऑस्कर विजेते ए.आर. रहमान आणि प्रसिद्ध हॉलिवूड कंपोजर हंस झिमर मिळून तयार करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raghav Juyal to play Meghnath in 'Ramayana' movie.

Web Summary : Raghav Juyal joins Nitesh Tiwari's 'Ramayana' as Meghnath. He replaces rumored Vikrant Massey. Ranbir Kapoor stars as Ram, Sai Pallavi as Sita, and Yash as Ravan. The film is planned for a 2026 Diwali release.
टॅग्स :रामायणविक्रांत मेसीबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकाररणबीर कपूरसाई पल्लवी