रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन नवीन विक्रम मोडत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र, सध्या त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, चाहते याला निव्वळ योगायोग म्हणायचे की 'इच्छापूर्ती', असा प्रश्न विचारत आहेत.
काय आहे तो व्हायरल व्हिडिओ?हा व्हायरल व्हिडिओ सुमारे १२ वर्षांपूर्वीचा असून तो 'कुबूल है' (Qubool Hai) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील आहे. या मालिकेतील एका सीनमध्ये राकेश बेदी एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे, त्या सीनमध्ये ते स्वतःची ओळख करून देताना म्हणतात, "धुरंधर भटावडेकर!". या क्लिपमध्ये राकेश बेदी म्हणतात, ''तुमचे अश्रू. पैसा, ही तुमची फालतूची नाटकं, राजकीय दबाव या सर्व गोष्टींचा धुरंधर भटावडेकरवर काहीही फरक पडणार नाही.''
आज १२ वर्षांनंतर, जेव्हा राकेश बेदी खरोखरच 'धुरंधर' नावाच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत, तेव्हा चाहत्यांनी हा जुना व्हिडिओ शोधून काढला आहे. 'धुरंधर' या शब्दाचा संबंध त्या मालिकेतील पात्राशी आणि आताच्या चित्रपटाशी जोडला गेल्याने सोशल मीडियावर चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
या व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले, "आदित्य धर यांनी १२ वर्षांपूर्वीच आपल्या भूमिकेची निवड केली होती की काय?" तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, "हे तर इच्छापूर्तीचे उदाहरण आहे. जे तुम्ही बोलता, ते एक दिवस खरंखुरं साकार उरतं."
चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक'धुरंधर २' मध्ये राकेश बेदी यांनी साकारलेला 'जमील जमाली' हा प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. त्यांच्या अभिनयावर खूश होऊन खुद्द रणवीर सिंहने म्हटले होते की, "जर चित्रपटाने १००० कोटी कमावले, तर त्यातील ५०० कोटींचे श्रेय केवळ राकेश जींना असेल." आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच ३०० कोटींहून अधिक कमाई केली असून, राकेश बेदी या चित्रपटाचे 'सरप्राईज पॅकेज' ठरले आहेत.
Web Summary : An old video of Rakesh Bedi from 'Qubool Hai', where he calls himself 'Dhurandhar Bhatavdekar', has resurfaced. This happened as Bedi is now playing a key role in the blockbuster 'Dhurandhar 2', leaving fans amazed by the coincidence and praising his performance.
Web Summary : 'क़ुबूल है' से राकेश बेदी का एक पुराना वीडियो वायरल हो रहा है, जहाँ उन्होंने खुद को 'धुरंधर भटावडेकर' कहा था। अब बेदी ब्लॉकबस्टर 'धुरंधर 2' में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं, जिससे प्रशंसक हैरान हैं और उनके प्रदर्शन की प्रशंसा कर रहे हैं।