बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर राजपाल यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. नुकताच त्याचा भूत बंगला हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात त्याने खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमात राजपालने केलेल्या कामाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. अलिकडेच त्याने 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या उंचीविषयी भाष्य केलं आहे.
उत्तम अभिनयशैलीमुळे लोकप्रिय असलेला राजपाल अनेकदा त्याच्या उंचीमुळे ट्रोलही झाला आहे. राजपालची उंची ५ फूट २ इंच इतकी असल्यामुळे लहानपणापासून त्याला लोकांचे टोमणे, मस्करी सहन करावी लागली. परंतु,या सगळ्या ट्रोलिंगचा सामना त्याने कसा केला हे त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं.
''लहानपणापासून माझी उंची कमीच होती. मी ५ फूट २ इंच एवढ्या उंचीचा आहे. लोक त्यावेळीही मला चिडवायचे. पण, माझी आई मला कायम सांगायची. माझा मुलगा एक ना एक दिवस आकाशाएवढी उंची गाठणार आहे. त्याच्या उंचीपेक्षा खूप मोठा होणार आहे. आणि, आईने दिलेल्या या आशीर्वादाची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. मी याचं जिवंत उदाहरण आहे'', असं राजपाल म्हणाला. दरम्यान, राजपाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. चेक बाऊन्स प्रकरणी तो चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणी त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं.
Web Summary : Rajpal Yadav discussed being trolled for his 5'2" height. He shared his mother's encouragement, which helped him overcome negativity. He also mentioned his recent film and past legal issues.
Web Summary : राजपाल यादव ने अपनी 5'2" ऊंचाई के लिए ट्रोल होने पर बात की। उन्होंने अपनी माँ के प्रोत्साहन को साझा किया, जिससे उन्हें नकारात्मकता से उबरने में मदद मिली। उन्होंने अपनी हालिया फिल्म और पिछली कानूनी समस्याओं का भी उल्लेख किया।