Join us

अयान मुखर्जीसोबत दिसली छोटी राहा कपूर, पापाराझींना पाहताच वैतागली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:07 IST

आलिया भट आणि रणबीर कपूरची लेक राहा पुन्हा दिसली, तिचे क्युट एक्सप्रेशन्स बघा

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhatt)  लाडकी लेक राहा कपूर (Raha Kapoor) आतापासूनच प्रसिद्धीझोतात असते. अवघ्या दीड वर्षांची राहा तिच्या क्टुटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच राहाचा समर स्पेशल लूक पाहायला मिळाला. तिला छानसा हेअरकट केला असून यावेळी ती आईवडिलांबरोबर नाही तर तिच्या लाडक्या काकाबरोबर दिसली. फिल्ममेकर अयान मुखर्जीसोबतचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबईल बांद्रा परिसरात अयान मुखर्जी छोट्या राहाला कडेवर घेऊन फिरताना दिसला. ते एका कॅफेमधून बाहेर पडत होते. तेव्हा पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. राहाने ग्रीन-व्हाईट रंगाचं शर्ट-पँट घातलं आहे. त्यात तिचा हेअरकट तर खूपच क्युट दिसतोय. पापाराझींची गर्दी पाहताच राहाचा चेहरा बदलतो. ती वैतागलेली दिसते. अयान मुखर्जीही पापाराझींवर नाराज होऊन फोटो घेऊ नका म्हणतो. 

राहाला पाहून नेटकऱ्यांनी आलिया भटची कॉपी असं म्हटलं आहे. तर काही जणांना ती ऋषी कपूर यांचीच कॉपी वाटत आहे. 'ही नेहमीच चिडलेली का असते, कधीच हसत नाही' अशाही कमेंट्स काही युझर्सने केल्या आहेत.

आलिया भट आणि रणबीर कपूर दोघंही आगामी सिनेमांमध्ये पुन्हा व्यस्त झाले आहेत. रणबीर कपूर सध्या 'रामायण' सिनेमाचं शूट करत आहे. तर आलियाने नुकतंच 'जिगरा' या तिच्या निर्मितीखाली बनत असलेल्या सिनेमाचं शूटिंग संपवलं आहे. रणबीर आणि आलिया दोघंही पुन्हा 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'लव्ह अँड वॉर' या सिनेमांमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरपरिवारबॉलिवूडसोशल मीडिया