Join us

अक्षय कुमारच्या फ्लॉप सीरिजमुळे विकावं लागलं ऑफिस? निर्माते वासू भगनानी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:28 IST

भगनानींनी त्यांच्या पूजा एंटरटेन्मेंट मधून काही कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढून टाकल्याची चर्चा झाली.

अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) गेल्या काही वर्षातील चित्रपट दणकून आपटले आहेत. 'राम सेतू', 'रक्षाबंधन' ते नुकताच रिलीज झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ'.  अक्षय कुमारच्या या फ्लॉप सिनेमांच्या सीरिजमुळेच नुकसान झाल्याने निर्माते वासू भगनानी (Vashu Bhagnani) यांना मुंबईतलं ऑफिसच विकलं अशी चर्चा सुरु झाली. तसंच भगनानींनी त्यांच्या पूजा एंटरटेन्मेंट मधून काही कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढून टाकल्याची चर्चा झाली. आता यावर निर्मात्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वासू भगनानी म्हणाले, "ऑफिसची इमारत विकलेली नाही अजूनही ती आमचीच आहे. लक्झरी घरांसाठी याचं अपार्टमेंटमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. बडे मियाँ छोटे मियाँ च्या रिलीज आधीच हा प्लॅन सुरु झाला होता. आम्ही कोणालाही नोकरीवरुन काढलेले नाही. गेल्या १० वर्षांपासून मी याच टीमसोबत काम करत आहे. आम्ही कोणालाच जायला सांगितलेले नाही."

ते पुढे म्हणाले, "हिट रिंवा फ्लॉप हा तर बिझनेसचाच एक भाग आहे. आम्ही आधीपासूनच एका प्रोजेक्टवर काम करत आहोत. ही एक अॅनिमेशन सीरिज असणार आहे जी मोठ्या स्केलवर प्रदर्शित होईल. मी तीस वर्षांपासून फिल्म बिझनेसमध्ये आहे. जर कोणाला वाटत असेल की मी कोणाचे पैसे दिलेले नाही तर त्यांनी डॉक्युमेंटसह समोर आलं पाहिजे किंवा सरळ केस दाखल केली पाहिजे."

वासू भगनानी यांच्या निर्मितीखाली अक्षय कुमारने गेल्या काही वर्षात बरेच सिनेमे केले. नुकत्याच रिलीज झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमाचं तर जोरदार प्रमोशनही झालं. मात्र सिनेमा फ्लॉप झाला. शिवाय याआधी याच प्रोडक्शन अंतर्गत त्याचे 'बेल बॉटम', 'कठपुतली' हे सिनेमेही फ्लॉप झाले होते.

टॅग्स :अक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड