Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी मुलगा असते तर..'; प्रियांकाला व्हायचं होतं मुलगा; मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:30 IST

Priyanka chopra: सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाने ही इच्छा व्यक्त केली होती.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडची देसीगर्ल असलेली प्रियांका आज क्वांटिको गर्ल म्हणून ओळखली. गेल्या काही काळामध्ये प्रियांकाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आज जगामध्ये तिची दखल घेतली जाते. यश, प्रसिद्धी, पैसा सारं काही उपभोग असणाऱ्या प्रियांकाचे पाय आजही जमिनीवर आहे. आणि, याचा प्रयत्न अनेकांना वेळोवेळी आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियांकाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यात तिने स्वत: एक मुलगा असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रियांकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती सिमी ग्रेवाल यांना मुलाखत देत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ मुलाखत सुरु होण्यापूर्वीचा आहे. यात या दोघी जणी गप्पा मारत आहेत. यावेळी बोलत असताना 'जर, मी मुलगा असते तर बरं झालं असतं', असं तिने म्हटलं. यामागचं कारणही तिने सांगितलं.

"मुलगी होणं किती कठीण आहे ना. माझी तर फार इच्छा आहे की मी मुलगा असावी. जर मी मुलगा असते तर मला काहीच करावं लागलं नसतं. फक्त एक जोडी जीन्स आणि टी-शर्ट घाला आणि चला", असं प्रियांका म्हणते. त्यावर पण आजकाल लोक खूप काही करतायेत, असं सिमी म्हणाली. सिमी ग्रेवालचं हे बोलणं ऐकल्यावर “पण जेवढं मुलींना करावं लागतं तेवढं मुलांना करावं लागतं नाही,” असंही प्रियांका म्हणाली. दरम्यान, अलिकडेच प्रियांकाची सिटाडेल ही हॉलिवूड वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर आता लवकरच ती  ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.  

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडहॉलिवूड