Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हॉलिवूडला का जायचं?', शाहरुखच्या विधानावर प्रियांका चिडली; म्हणाली, 'मी गर्विष्ठ नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:57 IST

हॉलिवूडला का जायचं? मी बॉलिवूडमध्येच कंफर्टेबल आहे. शाहरुखच्या वक्तव्याचा प्रियांकाला राग आला आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता हॉलिवूडमध्येच स्थिरावली आहे. १० वर्षांनंतर तिला पहिल्यांदाच मुख्य भूमिका असलेला हॉलिवूडसिनेमाही मिळाला आहे. 'सिटाडेल' (Citadel) हा तिचा सिनेमा लवकरत प्रदर्शित होणार आहे. मेहनतीने तिने आज हे यश मिळवले आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) हॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही असं विधान केलं. ग्लोबल स्टार प्रियांकाने शाहरुखच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

पठाण शाहरुख खानला नुकतेच एका मुलाखतीत हॉलिवूड सिनेमा करण्याबाबत विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, 'हॉलिवूडला का जायचं? मी बॉलिवूडमध्येच कंफर्टेबल आहे. बॉलिवूड हॉलिवूडपेक्षा जास्त चांगलं आहे.' 

हॉलिवूडबाबत शाहरुख खानने केलेल्या या कमेंटवर देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'कंफर्टेबल होणं माझ्यासाठी कंटाळवाणं आहे. मी गर्विष्ठ नाही. माझा स्वत:वर विश्वास आहे. जेव्हा मी सेटवर जाते तेव्हा मला माहित असते मी काय करत आहे. मला कोणाच्या परवानगीची गरज नसते. मी एका देशातील यशाचं ओझं दुसऱ्या देशात घेऊन जात नाही.'

प्रियांका पुढे म्हणाली, 'मी खूप प्रोफेशनल आहे. माझ्या आजुबाजुच्या लोकांना विचारलं तर तेही हेच सांगतील. मला याचा अभिमान वाटतो. माझे वडील आर्मीमध्ये होते. त्यांनी मला शिस्त शिकवली आहे. जे मिळालं आहे त्याचा अभिमान बाळगा असं त्यांनी मला शिकवलं आहे. त्याला हलक्यात घेऊ नका आणि डोक्यावरही चढवू नका. मी आज ज्या स्टेजवर आहे ते मी खूप मेहनतीने मिळवलं आहे. फालतू गोष्टींमध्ये मी वेळ घालवला नाही. मी नेहमीच कामावर लक्ष केंद्रित केलं आहे.' 

प्रियांका आणि शाहरुखने एकत्र काम केले आहे. त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. 'डॉन २' (Don 2) या गाजलेल्या सिनेमात त्यांच्या जोडीने लक्ष वेधले होते.

टॅग्स :हॉलिवूडशाहरुख खानप्रियंका चोप्राबॉलिवूडसिनेमा