Join us

कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:16 IST

पायल कपाडिया यांच्यावर गेल्या ९ वर्षांपासून केस सुरु आहे.

प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचा डंका गाजवणाऱ्या दिग्दर्शिक पायल कपाडिया (Payal Kapadia). यंदाच्या ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' साठी ज्युरी अवॉर्ड(ग्रांपी) मिळाला. जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. संपूर्ण भारतवासियांना तर त्यांचा अभिमान आहे. पण तुम्हाला माहितीये का पायल कपाडिया यांच्यावर गेल्या ९ वर्षांपासून केस सुरु आहे.

ही गोष्ट २०१५ सालची आहे. गजेंद्र चौहान यांना FTII च्या चेअरमनपदी नियुक्त करण्यात आलं होतं. याला पायलसह काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. गजेंद्र चौहान यांचं प्रोफेशनल पाहता ते या पदावर बसण्याच्या लायक नाहीत ही एक राजकीय नियुक्ती आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. विद्यार्थ्यांनी आंदोलन करत त्यांचा विरोध केला. FTII च्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारं ते आंदोलन होतं. आंदोलनाच्याकाही दिवसांनंतर तत्कालीन निदेशकांनी 2008 सालच्या बॅचला हॉस्टेल रिकामं करण्यास सांगितलं. कारण विचारल्यास सांगण्यात आलं की अनेक विद्यार्थ्यांचे फिल्म प्रोजेक्ट्स अपूर्ण आहेत. विद्यार्थी जाब विचारण्यासाठी गेले. विद्यार्थ्यांनी साखळी बनवत ऑफिसलाच घेराव घातला. मध्यरात्री पोलिस आले आणि त्यांनी 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. ३५ जणांविरोधात केस दाखल केली. यात पायल कपाडियाचंही नाव होतं. नंतर संस्थेने त्यांची स्कॉलरशीपही थांबवली.  शिवाय फॉरेन एक्सेंज प्रोग्राममध्येही सहभागी होऊ दिलं नाही. 

'स्लमडॉग मिलिनियर' साठी बेस्ट साऊंड मिक्सिंगचा ऑस्कर जिंकणारे रसूल पोकुट्टी सुद्धा FTII चे आहत. पायलच्या या यशानंतर त्यांनी ट्वीट करत लिहिले,'काय गंमत आहे बघा! पायल जी आरोपी नंबर 25 आहे, ती कान्समधून भारतात परत येईल आणि पुढच्याच महिन्यात तिला कोर्टात यावं लागणार आहे. गजेंद्र चौहानविरोधात FTII मध्ये आंदोन केल्याप्रकरणी तिच्यावर केस दाखल आहे.'

पायल कपाडिया यांचा जन्म मुंबईतच झाला. त्यांनी सोफिया कॉलेजमधून मास्टर्स केले. नंतर FTII मध्ये प्रवेश घेतला. त्यांची आई नलिनी मालिनी या भारताच्या पहिल्या जनरेशन व्हिडिओ आर्टिस्ट असल्याचं सांगितलं जातं.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलबॉलिवूडएफटीआयआयशिष्यवृत्तीपोलिस