Join us

बाबो..! कंगना राणौतसाठी बॉलिवूडचा हा अभिनेता पत्नीलाही सोडायला झाला होता तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:14 IST

कॉफी विद करण या शोमध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याने केला होता खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो कॉफी विद करण नेहमीच चर्चेत येत असतो. यात कलाकारांचे खुलासे व्हायचे, ज्यामुळे नेहमी वाद होताना दिसायचे. अशाच एका भागात अभिनेता अनिल कपूर, संजय दत्त आणि कंगना राणौत पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी करण जोहरने एक रॅपिड फायर सेशन केले होते. 

कॉफी विद करण शोमध्ये जेव्हा करण जोहरने अनिल कपूरला विचारले की, अशी कोणती महिला आहे जिच्यासाठी तू तुझ्या पत्नीला देखील सोडशील? यावर मजेशीर अंदाजात अनिल कपूरने कंगनाकडे इशारा केला आणि तिचे नाव घेत म्हटले होते की, मी कंगनासाठी माझ्या पत्नीलादेखील सोडून देईन. यावर करणने मस्करीत कंगनाला म्हटले की, मला वाटते की तुला काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला गेला की, संजय दत्तकडे असे काय आहे जे तुझ्याकडे नाही आहे?, त्यावर अनिल कपूरने उत्तर दिले, कोर्ट केस.

जुग जुग जियो सिनेमात झळकणार अनिल कपूरअनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो 'जुग जुग जियो' चित्रपटात झळकणार आहे. यात अनिल कपूरसोबत वरूण धवन, कियारा आडवाणी आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कंगना राणौत दिसणार या सिनेमातकंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर बरेच चित्रपट पाईपलाईनमध्ये आहे. यात 'तेजस', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ डिड्डा', 'इमरजेंसी', 'धाकड़' आणि 'द अवतार: सीता' या चित्रपटांचा समावेश आहे.

टॅग्स :कंगना राणौतअनिल कपूरकरण जोहर