Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीचा मेट्रोने प्रवास; चाहत्यांबरोबर ट्रेनमध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 19:01 IST

'मडगाव एक्सप्रेस'च्या प्रमोशनसाठी नोरा फतेही आणि टीमने नुकताच मेट्रोतून प्रवास केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या आगामी 'मडगाव एक्सप्रेस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच 'मडगाव एक्सप्रेस' सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'मडगाव एक्सप्रेस'च्या प्रमोशनसाठी नोरा फतेही आणि टीमने नुकताच मेट्रोतून प्रवास केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत नोरा फतेही आणि 'मडगाव एक्सप्रेस'चे दिग्दर्शक कुणाल खेमु मेट्रो स्टेशनवर दिसत आहेत. मेट्रोने प्रवास केल्यानंतर ते प्रवाशांबरोबर डान्सही करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन नोरा आणि कुणाल खेमूचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, 'मडगाव एक्सप्रेस' सिनेमातून अभिनेता कुणाल खेमू दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या सिनेमात नोरा फतेही, प्रतिक गांधी, दिव्येंदू शर्मा, करीना कपूर, विकी कौशल, अविनाश तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मराठमोळा उपेंद्र लिमयेदेखील या सिनेमात झळकणार आहे. येत्या २२ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :नोरा फतेहीमेट्रोसिनेमासेलिब्रिटी