Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीचा गुरू रंधावासोबतच डान्स व्हिडीओ लीक, लवकरच होणार आहे धमाका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 11:05 IST

नोराच्या एका नव्या म्युझिक व्हिडीओच्या शूटचा व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत नोरा रॅपर गुरू रंधावासोबत डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडमधील बेस्ट डान्सरपैकी एक असलेली नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे. तिचे इंडियाज बेस्ट डान्स शोमधील किंवा बीचवरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धमाका करत आहेत. अशात तिच्या एका नव्या म्युझिक व्हिडीओच्या शूटचा व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत नोरा रॅपर गुरू रंधावासोबत डान्स करताना दिसत आहे.

नोरा फतेहीने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शन लिहिले आहे की, 'OMG! कुणीतरी 'नाच मेरी राणी' च्या रिहर्सलचा व्हिडीओ लीक केला आहे. ठीक आहे आता व्हिडीओ समोर आलाच आहे तर ऑफिशिअल रिलीज आधीच याला हिट करूया...चला करूया!. तुमच्या मुव्ह्स आणि प्रेम मला दाखवा. या गाण्यावर व्हिडीओ बनवून #NachMeriRani हॅशटॅग वापरून आमच्यासोबत शेअर करा. (VIDEO : ना स्टेज ना पब्लिक नोरा पार्कमध्येच करू लागली जबरदस्त डान्स, फॅन्सची उडाली झोप!)

गुरू रंधावाने शेअर केला नोरासोबतचा खास फोटो

नोराच्या या व्हिडीओवर गुरू रंधावाने कमेंटही केली आहे. त्याने लिहिले आहे की, 'तू आणि तुझ्या मुव्ह्स इंडियाला क्रेझी करतील'. तसेच गुरू रंधावाने सुद्धा ही क्लिप त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यासोबतच गुरूने नोरासोबतच एक खास फोटोही शेअर केला आणि त्यामुळे दोघांच्याही फॅन्सची उत्सुकता वाढली आहे. 

दरम्यान, मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर नोराने इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये तिची जागा घेतली होती. आता मलायका परत आल्याने नोरा बाहेर पडली. पण इतक्या कमी दिवसातच तिच्या येण्याने या शोचा टीआरपी कमालीचा वर गेला होता. (नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?')

नोरा लवकरच अजय देवगनच्या 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमात दिसणार आहे. असे मानले जात आहे की, या सिनेमात ती तिच्या डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहे. नोराने आतापर्यंत तिच्या 'दिलबर', 'कमरिया', 'गर्मी', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' सारख्या गाण्यांमधून जगाला वेड लावलं आहे.  

टॅग्स :नोरा फतेहीसोशल व्हायरलबॉलिवूड