Join us
Daily Top 2Weekly Top 5

कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 10:32 IST

नुकतेच बहिण नव्या नवेली नंदा हिने एका मुलाखतीमध्ये आराध्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. 

बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आराध्या ही देखील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. ती नेहमीच तिची आई ऐश्वर्यासोबत दिसते. आराध्या ही एका प्रसिद्ध बॉलिवूड घराण्याची मुलगी आहे, त्यामुळे चाहत्यांना तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. नुकतेच बहिण नव्या नवेली नंदा हिने एका मुलाखतीमध्ये आराध्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. 

नव्याला ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आराध्याला तू कोणता सल्ला देशील, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नव्याने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती म्हणाली, 'आराध्या 12 वर्षांची आहे आणि ती तिच्या वयानुसार खूप हुशार आहे. मी तिला काही सल्ला देण्याची गरज वाटत नाही. आराध्याला खूप आत्मविश्वास आहे. एवढ्या लहान वयात तिला समाज आणि जगाविषयी खूप माहिती आहे. ती प्रत्येक गोष्टीबद्दल खूप जागरूक आहे. हे आजच्या पिढीत क्वचितच पाहायला मिळते'.

पुढे ती म्हणाली, 'ती इतकी लहान असून मी तिची प्रशंसा करतेय. पण ती खरंच खूप हुशार आहे.आराध्या तिच्या वयाच्या मानाने खूपच परिपक्व आहे. जेव्हा मी 12 वर्षांची होते तेव्हा मी इतका हुशार नव्हते. तिचा आत्मविश्वास भारावून टाकणार आहे.  घरातील बऱ्याच गोष्टी शेअर करण्यासाठी मला एक छोटी बहीण आहे, याचा मला खूप आनंद आहे'. 

आराध्या ही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. काही महिन्यांपुर्वी ऐश्वर्या राय बच्चनचा 50 वा वाढदिवस साजरा झाला होता. यावेळी छोट्या आराध्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. तिने आईसाठी दिलेलं स्पीच व्हायरल झालं होतं. एवढ्या लहान वयातही तिने खूप छान स्पीच दिलं. हे पाहून ऐश्वर्याही खूश झाली होती. आराध्या तिची आई ऐश्वर्याच्या खूप जवळ आहे. प्रत्येक फंक्शनमध्ये ती नेहमी आईसोबत दिसते. अनेकदा आराध्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाअमिताभ बच्चनजया बच्चननव्या नवेली