Join us

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने काढली शालेय मुलींची छेड; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:48 IST

Sreejith ravi: शिक्षिका आणि मुलींनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ५०९ अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे.

कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि वादविवाद यांचा जवळचा संबंध आहे. असे अनेक लोकप्रिय, प्रसिद्ध कलाकार आहेत जे कोणत्या ना कोणत्या वादात अडकल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच सध्या एका दाक्षिणात्य अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. शालेय मुलींची आणि शिक्षिकांची छेड काढल्याप्रकरणी या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

केरळमधील प्रसिद्ध मल्याळम अभिनेता श्रीजीत रवि (sreejith ravi) याला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीजीत रविने काही शालेय मुलींसोबत आणि शिक्षिकांसोबत गैरवर्तन केलं. श्रीजीतने वाईट हातवारे करत त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवायचा प्रयत्न केला असा आरोप या शालेय मुलींनी केला आहे. इतकंच नाही तर मुलींच्या मनाविरुद्ध त्याने मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले.

दरम्यान, शिक्षिका आणि मुलींनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ५०९ अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे. श्रीजीत ओट्टापलन येथे शूटिंग करत असताना त्याला सेटवरुन अटक करण्यात आली. परंतु, हे सगळे आरोप श्रीजीतने फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही २०१६ मध्ये पलक्कडमधील १४ विद्यार्थीनींनी श्रीजीत विरोधात अशीच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन त्याला अटकही झाली होती. मात्र, त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीबॉलिवूडगुन्हेगारी