Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कपूरने केला विश्वासघात? अभिनेत्याच्या वाढदिवसाला मलायकाने शेअर केली सूचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:41 IST

'मला तेच लोक आवडतात जे...' मलायकाची सूचक पोस्ट काय?

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अर्जुनच्या घरी रात्रीच जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र पार्टीत अर्जुन कपूरची लेडी लव्ह मलायका अरोरा (Malaika Arora) चक्क गायब होती. अर्जुनच्या बर्थडेला मलायका गैरहजर असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अर्जुन-मलायकाचं 5 वर्षांचं नातं संपलं अशी चर्चा सुरु आहे.

अर्जुन आणि मलायका हे कपल बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असतं. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. काल रात्री उशिरा त्याच्या बांद्रा येथील घरी अर्जुन कपूरची बर्थडे पार्टी झाली. अनेक बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली. त्याचा जवळचा मित्र वरुण धवन, नताशा, बहीण जान्हवी कपूर, शनाया कपूर, आदित्य रॉय कपूर. मोहित मारवाह, संजय कपूर पत्नी महीप कपूरसह काही जणांनी हजेरी लावली. पण या सर्व गर्दीत मलायका अरोरा गायब होती. गर्लफ्रेंड मलायकानेअर्जुनच्या स्पेशल डेला हजेरी न लावल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

तर दुसरीकडे मलायकान ेअर्जुन कपूरला सोशल मीडियावरही अद्याप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. उलट तिने एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले आहे की, "मला तेच लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करुन आणि माझ्या पाठीमागेही विश्वास ठेवू शकते."

मलायकाच्या गैरहजेरीमुळे आता अर्जुन कपूर आणि तिच्यात दुरावा आल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही आता खऱ्या वाटू लागल्या आहेत. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. तिला २२ वर्षांचा एक मुलगाही आहे. वयातील अंतारमुळे कायम कपलला ट्रोल करण्यात आलं आहे. अद्याप दोघांनी ब्रेकअपच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराबॉलिवूडरिलेशनशिपसोशल मीडिया