Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे बाबूराव अन् चुलबुल पांडे बघा! लाहोरच्या युनिव्हर्सिटीत साजरा झाला 'बॉलिवूड डे'; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:40 IST

पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापिठात चक्क 'बॉलिवूड डे' साजरा करण्यात आला.

बॉलिवूड चित्रपटांचे चाहते जगभरात आहेत. बॉलिवूडचे अनेक असे आयकॉनिक सिनेमे आहेत जे सर्वांच्याच मनात घर करुन आहेत. पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापिठात चक्क 'बॉलिवूड डे' साजरा करण्यात आला. विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी बॉलिवूडच्या अनेक आयकॉनिक कॅरेक्टरचे आऊटफिट परिधान करुन डायलॉगबाजी केली. कोणी चुलबुल पांडे तर कोणी 'बर्फी' ची झिलमिल तर कोणी 'मोहोब्बते'च्या शाहरुख खानचे कॅरेक्टर पकडले. या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ वेगाने शेअरही केला जात आहे.

पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथे 'बॉलिवूड डे'सेलिब्रेट करण्यात आला. त्याचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत कोणी दबंग अभिनेता सलमान खानचे चुलबुल पांडे हे कॅरेक्टर केले आहे तर कोणी 'मोहोब्बते' सिनेमातील शाहरुख खानचे 'राज'हे कॅरेक्टर पकडले आहे. तर एक जण 'मिर्झापूर'चा मुन्ना भैय्या बनला आहे.तर कोणी 'बर्फी'तील झिलमिल साकारली आहे. 'ये बाबूराव का स्टाईल है' असं म्हणत एक जण 'हेरा फेरी' चा परेश रावल बनला आहे. फक्त आऊटफिट नाही तर हे विदयार्थी त्यांचे डायलॉगही म्हणत आहेत.

या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणी त्यांचे कौतुक केले आहे तर कोणी बॉलिवूड चा प्रचार करण्याची गरजच काय असेही म्हणले आहे. तरी या विद्यार्थ्यांनी साकारलेले कॅरेक्टर बघून धमाल येते हे नक्की.

टॅग्स :पाकिस्तानबॉलिवूडसोशल मीडियाट्विटर