Join us

लग्नानंतर क्रितीने सासरी बनवला 'हा' खास पदार्थ, आजीबाईंकडून शाबासकीची थाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 16:11 IST

लग्नानंतर क्रितीने सासरी एक खास पदार्थ बनवला असून तिला सासरच्यांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे

काही दिवसांपुर्वी जवळचे मित्र - मैत्रीणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अभिनेत्री क्रिती खरबंदाने अभिनेता पुलकित सम्राटसोबत लग्न केलं. क्रिती आणि पुलकितच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अशातच क्रितीने सासरी गेल्यानंतर एक खास पोस्ट केलीय. नववधू क्रितीने पुलकितच्या घरच्यांसाठी लग्नानंतर एक गोड पदार्थ बनवला आहे.

क्रितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. क्रितीने गोड हलवा बनवला असून ती ड्रायफूट्सने हलव्याची डिश सजवताना दिसत आहे. 'माय फर्स्ट किचन' असं कॅप्शन देत क्रितीने हे फोटो शेअर केलेत. इतकंच नव्हे पुढे आणखी एक फोटो शेअर करत "आजीबाईंनी दिली मंजुरी", असं कॅप्शन देत सासरी क्रितीने तयार केलेल्या पहिल्याच पदार्थाचं आजीबाईंनी कौतुक केलंय.

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट या कलाकार जोडीने काहीच दिवसांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं. पुलकित - क्रितीच्या लग्नाच्या सुंदर फोटो - व्हिडीओला चाहत्यांनी पसंती  दिली. लग्नानंतर या दोघांचा वरातीचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच गाजला. पुलकित - क्रिती गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. अखेर दोघांनी एकमेकांसोबत मानेसर येथील ITC हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली.

टॅग्स :कृति खरबंदाबॉलिवूडलग्न