Join us

'या' रोमॅन्टिक ठिकाणी सिद्धार्थने कियाराला केलेलं प्रपोझ; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 19:36 IST

सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवानी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या कपलशी संबंधीत अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक किस्सा आताही समोर आला आहे. 'कॉफी विथ करण'च्या ८ व्या सीजनमध्ये कियारा आणि विकी कौशलने हजेरी लावली. यावेळी कियाराने आयुष्यातील अनेक गुपित उघड केली आहेत.

'कॉफी विथ करण सीजन ८' चा नवा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये कियारा आणि विकी कौशल हे करण जोहरसोबत मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी सिद्धार्थने कुठे प्रपोझ केले, हे कियाराने सांगितले. करणशी बोलताना कियाराने सांगितले की, तिला सिद्धार्थने रोममध्ये प्रपोज केले होते. तसेच सिद्धार्थला ती मंकी नावाने हाक मारते, असेही कियाराने सांगितले.

याआधी सिद्धार्थने 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा सिद्धार्थने तो कियाराला 'लव्ह, की आणि बी' या नावाने हाक मारतो, असे तो म्हणाला होता. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे, काजोल-राणी, करीना-आलिया आणि वरुण-सिद्धार्थ यांनी हजेरी लावली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग पाहू शकतात.

टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसेलिब्रिटीसिद्धार्थ मल्होत्राकरण जोहरविकी कौशल