Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:21 IST

'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमारचा हा सिनेमा एक भन्नाट विषय घेऊन येणार आहे (khel khel mein)

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होत आहेत. अक्षय कुमारचा आणखी एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'खेल खेल में'. मल्टिस्टारर असलेला 'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर आज नुकताच रिलीज झाला. हसवता हसवता एक महत्वाचा विषय 'खेल खेल में' सिनेमातून मांडला जात आहे.  सिनेमाचा ट्रेलर ३ मिनिटांचा असून अनेक गोष्टी उलगडत आहेत.

'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'खेल खेल में' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ट्रेलरमध्ये दिसतं की ७ श्रीमंत घरातील माणसं एकमेकांचे मित्र असतात. यात सात पैकी तीन जोडपी असतात. पुढे हे सर्वजण एका हॉटेलमध्ये मजा-मस्ती करण्यासाठी येतात. नंतर एक खेळ खेळला जातो. दिवस उजाडत नाही तोवर एका संपूर्ण रात्री सर्वांचे फोन पब्लिक प्रॉपर्टी म्हणून वापरले जातात. म्हणजेच प्रत्येकाच्या फोनमध्ये रात्रभर एखादा फोन, मॅसेज किंवा इतर गोष्टींचे अपडेट झाले तर ते सर्वांना कळणार. आता या खेळामुळे नात्यांची समीकरणं कशी बदलणार, ही गोष्ट सिनेमात बघायला मजा येईल.

'खेल खेल में'ची स्टारकास्ट आणि रिलीज डेट

'खेल खेल में' सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान, अॅमी वर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल या कलाकारांच्या प्रमूख भूमिका आहेत. 'खेल खेल में' सिनेमा या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमासोबत 'स्त्री २' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. त्यामुळे 'खेल खेल में' आणि 'स्त्री २' यापैकी कोणता सिनेमा चालणार आणि कोणता फ्लॉप होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अक्षय कुमारफरदीन खानवाणी कपूरतापसी पन्नूबॉलिवूडमोबाइल