Join us

अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:44 IST

अक्षय कुमार - फरदीन खान - तापसी पन्नूचा आगामी 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे त्याविषयी पहिला review समोर आलाय (khel khel mein, akshay kumar)

अक्षय कुमार हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. अक्षयच्या एकामागोमाग एक सिनेमांचा धडाका सुरुच आहे. अक्षय कुमारचा या वर्षातील आणखी एक सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा सिनेमा म्हणजे 'खेल खेल में'. अक्षयसोबत फरदीन खान, तापसी पन्नू, वाणी कपूर हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षयचा आगामी 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे याविषयी पहिला review समोर आलाय. 

कसा आहे 'खेल खेल में'? पहिला review समोर

अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान यांचा 'खेल खेल में' सिनेमा काहीच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा कसा आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता असेल. तर या सिनेमाविषयी पहिला review समोर आलाय. निर्माते अमर बुटाला यांनी या सिनेमाचा review शेअर केलाय. अमर लिहितात, "खेल खेल में सिनेमात खूप मजा आहे. निखळ कॉमेडी या सिनेमात पाहायला मिळते. खूप काळानंतर अक्षय कुमार सरांना कॉमेडीमध्ये धमाका करताना पाहायला मिळतो. एमी वर्क आणि तापसी पन्नू यांनीही सुंदर काम केलंय. फरदीन खानही दमदार आहे. हा सिनेमा आताच्या आता सिनेमागृहांमध्ये जाऊन बघा. खूप शुभेच्छा." असं म्हणत अमर बुटाला यांनी अक्षयच्या सिनेमाचं कौतुक केलंय. 

 

'खेल खेल में' सिनेमाविषयी

'खेल खेल में' सिनेमात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान, अॅमी वर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल या कलाकारांच्या प्रमूख भूमिका आहेत. 'खेल खेल में' सिनेमा या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमासोबत 'स्त्री २' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. त्यामुळे 'खेल खेल में' आणि 'स्त्री २' यापैकी कोणता सिनेमा चालणार आणि कोणता फ्लॉप होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अक्षय कुमारवाणी कपूरबॉलिवूडतापसी पन्नू