Kesari 2 Box Office Collection Day 10: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar )'केसरी-२' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन जवळपास १० दिवस उलटले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. केसरी-२ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. करण त्यागी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारसह आर.माधवन आणि अनन्या पांडे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. या ऐतिहासिक सिनेमात प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
'केसरी-२' १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानंतर आतापर्यंत अक्षय कुमारच्या या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केसरी-२ ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. नवव्या दिवशी चित्रपटाने ७.२० कोटी कमाई केली होती. त्यानंतर दहाव्या दिवसामध्ये केसरी-२ च्या व्यवसायात आणखी वाढ झाल्याची पाहायला मिळते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सनी देओलच्या टक्कर देताना दिसतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार- आर.माधवनच्या या चित्रपटाने १० व्या दिवशी जवळपास ८.१५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसंच आतापर्यंत केसरी-२ चित्रपटाने ६५.९४ कोटींचं कलेक्शन केलं आहे.
'केसरी-२' ची आतापर्यंतची कमाई....
पहिला दिवस- ७.८४ कोटी
दुसरा दिवस- १०.८ कोटी
तिसरा दिवस- ११.७० कोटी
चौथा दिवस- ४.५० कोटी
पाचवा दिवस- ५.०४ कोटी
सहावा दिवस-३.७८ कोटी
सातवा दिवस-३.६० कोटी
आठवा दिवस-४.०५ कोटी
नववा दिवस-७.२० कोटी
दहावा दिवस- ८.१५ कोटी
एकूण कलेक्शन- ६५.९४ कोटी
मीडिया रिपोर्टनुसार, 'केसरी-२' चित्रपटाचं बजेट २८० कोटी इतकं आहे. त्यानंतर प्रदर्शनाच्या १० दिवसांत चित्रपटाने ६५.९४ कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या सिनेमात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडेने दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. 'केसरी-२' चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.