Join us

प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 19:52 IST

मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन ...

मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. आता बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. यातच कतरिना कैफचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो जानेवरी महिन्यातील आहेत. नववर्षानिमित्त ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून कतरिना माध्यमांपासून लांबच आहे.  कोणत्याच कार्यक्रमाला तिने हजेरी लावली नाही. ती जाणूनबुजून माध्यमांपासून आणि पापाराझींपासून दूर राहतेय, असं म्हटलं जात आहे. अंबानींच्या घरातील गणपती पूजा असो अथवा लालबागचा राजा दर्शन...या सगळ्या ठिकाणी विकी कौशल एकटाच दिसला. लग्नापासून विकी कौशल आणि कतरिना कैफ प्रत्येक इव्हेंटदरम्यान एकत्र हजेरी लावायचे. परंतु, लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशल एकटाच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतोय. कतरिना कैफ गरोदर असल्यामुळे ती कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची शंका चाहत्यांना आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला होता.

 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी