अभिनेत्री कतरिना कैफने गेल्या वर्षी ७ नोव्हेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव विहान ठेवण्यात आलं. लेकाच्या जन्मानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ हे कपल पहिल्यांदाच सोबत दिसून आलं. विकी कौशलने याआधी कतरिना शिवाय अनेक इव्हेंट्समध्ये एकट्यानेच हजेरी लावली होती. मात्र काल पहिल्यांदाच कतरिना कैफ कॅमेऱ्यासमोर आली. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिची झलक दिसल्याने चाहत्यांनाही आनंद झाला. विकी-कतरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता बऱ्याच महिन्यांनी दोघं एकत्र कॅमेऱ्यासमोर आले आहेत. कतरिना कैफ यावेळी ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. लांब ब्लॅक कोट, ब्लॅक गॉगल, ब्लॅक शूज आणि लांबसडक सरळ केस असा न्यू मॉम कतरिनाचा लूक होता. तर विकी कौशल नेहमीसारखाच कॅज्युअल अंदाजात दिसला. दोघांनी हसत कॅमेऱ्यासमोर पोजही दिली. मात्र कतरिना यावेळी घाईत दिसली. काही सेकंदच तिने पापाराझींसमोर पोज दिली आणि ती तिथून निघाली. न्यू मॉमची ही काही सेकंदांची झलक पाहूनही चाहते खूश झाले आहेत.
'विहानचे क्युट पालक','किती सुंदर जोडी','पॉझिटिव्ह व्हाईब्स','किती दिवसांनी ही जोडी दिसली' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी 'कतरिना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का' अशाही कमेंट केल्या आहेत.
कतरिना बऱ्याच काळापासून कतरिना स्क्रीनवरुन गायब आहे. २०२४ साली ती शेवटची 'मेरी ख्रिसमस' सिनेमात दिसली. वयाच्या ४२ व्या वर्षी वर्षी तिने मुलाला जन्म दिला. तसंच तिचा स्वत:चा ब्युटी ब्रँडही आहे. कतरिनाला पुन्हा स्क्रीनवर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. २०२१ साली कतरिनाने विकी कौशलशी लग्न केलं. लग्नानंतर ५ वर्षांनी ते आईबाबा झाले. विकी कौशलने 'छावा' हा ब्लॉकबस्टर हिट दिला. तर आता तो आगामी 'महावतार' सिनेमाच्या तयारीत व्यग्र आहे.
Web Summary : Katrina Kaif and Vicky Kaushal were spotted together after their son's birth. Katrina, in an all-black look, posed briefly for the paparazzi. Fans expressed their joy at seeing the couple together after a long time, with some speculating about a second pregnancy.
Web Summary : बेटे के जन्म के बाद कैटरीना कैफ और विक्की कौशल एक साथ दिखे। कैटरीना ब्लैक लुक में थीं और उन्होंने पैपराजी के लिए पोज दिया। फैंस ने लंबे समय के बाद इस कपल को एक साथ देखकर खुशी जताई, कुछ लोगों ने दूसरी प्रेग्नेंसी के बारे में अटकलें लगाईं।