Join us

Photo Gallery: प्रतीक्षा संपली! Katrina Kaif-Vicky Kaushal च्या लग्नाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:48 IST

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:विकी आणि कतरिना या जोडीने लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, कडक सुरक्षा आणि खबरदारी घेतल्यानंतरही या लग्नाचे फोटो लीक झाले आहेत. 

२०२१ या वर्षातील बहुचर्चित ठरलेला विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा लग्नसोहळा आज संपन्न झाला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती या दोघांनी राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये हा लग्नसोहळा संपन्न झाला असून या सोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत.

विकी आणि कतरिना या जोडीने लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, कडक सुरक्षा आणि खबरदारी घेतल्यानंतरही या लग्नाचे फोटो लीक झाले आहेत. 

या लग्नसोहळ्यासाठी विकी आणि कतरिनाने भरजरी कपड्यांना पसंती दिली होती. यावेळी कतरिनाने डार्क पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता.तर, विकीने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती.

सध्या विकी-कतरिनाच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांच्या फॅनपेजवर आणि पापाराझींच्या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंसोबत काही व्हिडीओचादेखील समावेश असल्याचं पाहायला मिळतं. 

celebrity_pap_ आणि  instant bollywood या दोन पेजवर विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये विकी-कतरिनाच्या वरमाला प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा

दरम्यान, विकी-कतरिनाचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर या दोघांनी या विवाहस्थळाच्या बाहेर असलेल्या छायाचित्रकारांमध्ये लाडू आणि अन्य मिठाई वाटली.  

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी