Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाली म्हणून तिला दूर सारलं तिच लेक आज गाजवतीये बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:43 IST

Karishma tanna: 'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी ही अभिनेत्री आज लोकप्रिय बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे.

उत्तम अभिनयशैलीसह बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा तन्ना (karishma tanna). बऱ्याचदा करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते. यावेळीदेखील तसंच काहीसं झालं आहे. अलिकडेच करिश्माने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या बालपणींच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. यात लहानपणी वडिलांनी मुलगी झाली म्हणून तिला नाकारल्याचं तिने सांगितलं.

'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी करिश्मा आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिश्माने आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही तितकाच दांडगा आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यात तिने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाइफविषयी काही खुलासे केले आहेत.

"मी मोठी झाल्यानंतर माझ्या आईने मला सांगितलं की माझ्या जन्मानंतर माझे वडील फारसे खूश नव्हते. जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळी माझे वडील नाराज झाले होते. त्यांना मुलगा हवा होता. एका टिपिकल गुजराती कुटुंबाप्रमाणेच त्यांच्यावरही दडपण होतं. माझ्या आईला दोन मुली होत्या त्यामुळे माझे आजी-आजोबाही तिच्याशी फार चांगलं वागत नव्हते.  आम्हालाही त्यांनी चांगलं वागवलं नाही. पण, त्या सगळ्या अनुभवातून मी खंबीर झाले", असं करिश्मा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळी आठवडाभर माझ्या आईने माझा चेहरा पाहिला नव्हता. माझे वडील तर महिनाभर माझ्याजवळही आले नाहीत. माझ्या आईने मला हे सांगितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं होतं. याचा अर्थ माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेम नाहीये असं नाही. पण दुसऱ्यांदा सुद्धा मुलगीच झाली याचं दु:खं होतं. कारण, मुलगी झाली म्हटल्यावर आम्हाला घरात कशी वागणूक मिळणार याची त्यांना कल्पना होती आणि तेच त्यांच्यावर मोठं दडपण होतं.त्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी तुमचा मुलगा होऊन दाखवेन आणि मी ते त्यांना करून दाखवलं.”

दरम्यान, करिश्माने मालिकांसह अनेक रिअॅलिटी शो, सिनेमांमध्ये काम केलं आहे संजू सिनेमामध्येही तिने छोटेखानी भूमिका साकारली होती. तसंच स्कूप या हंसल मेहता दिग्दर्शित वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे. 

टॅग्स :करिश्मा तन्नाबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा