Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kareena Kapoor Khan Video : करिनाच्या योगा सेशनमध्ये आला 'क्युट' पार्टनर; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:08 IST

अभिनेत्री करिना कपुर सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. अशाच एका योगा सेशनसाठी करिनाला एक क्युट पार्टनर मिळाला आहे.

Kareena Kapoor Khan Video : अभिनेत्री करिना कपुर सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. अशाच एका योगा सेशनसाठी करिनाला एक क्युट पार्टनर मिळाला आहे. करिनाचा धाकटा मुलगा जहांगिर सुद्धा योगा सेशन मध्ये जॉईन झाला . याचा क्युट व्हिडिओ समोर आला आहे.

करिना कपुरच्या योगा ट्रेनरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये करिना योगा मॅटवर योगा करताना दिसत आहे. तर धाकटा मुलगा जेह तिथेच घुटमळताना दिसतोय. करिना योगा करत असताना तो तिच्या मध्ये मध्ये येताना दिसत आहे. जहांगिरला अशी मस्ती करण्यात खुपच मजा येत आहे आणि करिना सुद्धा मजा घेत आहे.

याआधीही करिनाने दिवाळीच्या वेळेस एक फोटो शेअर केला होता. त्यात जेहचा अजिबातच मूड नव्हता. तर करिना कपुर, सैफ अली खान आणि तैमुर पोज देताना दिसत आहेत. करिनाने शेअर केलेला हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता. तैमुर आणि जेह दोघेही किती मस्तीखोर आहेत हे अनेकदा सोशल मीडियावरुन दिसून येते. चाहतेही त्यांची मजा घेताना दिसतात.

करिनाने २०१६ साली तैमुरला जन्म दिला तर जहांगिरचा जन्म २०२१ साली झाला. दोघेही नेहमी कॅमेऱ्यासमोर अॅक्टीव्ह असतात. 

टॅग्स :करिना कपूरतैमुरयोगासने प्रकार व फायदेसोशल मीडियाइन्स्टाग्राम