Join us

"मला तर चार मुलं आहेत"; सैफला सतावते मुलांच्या लग्नात होणाऱ्या खर्चाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:29 IST

Saif ali khan: 'भूत पोलीस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री यामी गौतम आणि सैफ अली खानला कपिलने त्यांच्या लग्नासंबंधित काही प्रश्न विचारले.

ठळक मुद्देअलिकडेच सैफने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

अभिनेता सैफ अली खान कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. यात अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे तो जास्त चर्चिला जातो. अलिकडेच सैफने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याच्या भूत पोलीस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो कपिलच्या सेटवर पोहोचला होता. मात्र, यावेळीदेखील चित्रपटापेक्षा त्याच्या पर्सनल लाइफचीच चर्चा झाली. विशेष म्हणजे, सैफला आतापासून तिच्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावत असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

'भूत पोलीस'च्या प्रमोशनसाठी आलेल्या अभिनेत्री यामी गौतम आणि सैफ अली खानला कपिलने त्यांच्या लग्नासंबंधित काही प्रश्न विचारले. यावेळी 'माझ्या लग्नाला केवळ २० माणसंच होती', असं यामीने स्पष्ट केलं. परंतु, सैफने त्याच्या लग्नाऐवजी मुलांच्या लग्नाची चिंता असल्याचं म्हटलं.

हनी सिंगला कोर्टाने बजावली नोटीस; UAE संपत्तीच्या हस्तांतरणावर निर्बंध

"मी आणि करीनाने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, कपूर परिवार किती मोठा आहे याचा तुम्हाला अंदाज असेलच. या एका परिवारातच मिळून २०० लोक झाले होते", असं सैफ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला महागड्या लग्नांची भीतीच वाटते. मला तर आता चार मुलं आहेत", असं म्हणत सैफने लग्नात होणाऱ्या खर्चाविषयी चिंता व्यक्त केली. मात्र, त्याने मजेशीर अंदाजात केलेल्या या वक्तव्यामुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हसू फुटलं.

दरम्यान,सैफचा 'भूत पोलीस' हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तो कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिसदेखील सहभागी झाले होते.

टॅग्स :सैफ अली खान सारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीलग्न