Join us  

कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 8:12 PM

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत.

अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण धर्मशाला येथे सुरू आहे. या ठिकाणी रणवीर सिंगने सर्व कलाकारांसोबत मजा मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

कबीर खान दिग्दर्शित '८३' चित्रपट १० एप्रिल, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात १९८३ सालची भारतीय विश्वचषक विजयाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. यात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटासाठी खुद्द कपिल देवने रणवीर सिंगला क्रिकेटचे बारकावे सांगितले आहे.

इतर कलाकारांबद्दल सांगायचे तर एमी विर्क बलविंदर सिंगची भूमिका करणार आहे. ज्यांनी ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केले होते.

क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. साकीब सलीम ऑल राउंडर मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जे त्यावेळी इंडिया टीमचे उपकर्णधार होते. त्यांची वर्ल्ड कपच्या सेमी फायनल व फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घोषित केले होते.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना निभावणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते.

 १९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी दिग्दर्शनात पदार्पण करतेय. आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.  '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी १५ मे रोजी रवाना होणार आहेत

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंगआदिनाथ कोठारेपंकज त्रिपाठीसाकिब सलीम