Join us
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबर ध्रुव राठीवर भडकली कंगना रणौत, म्हणाली - 'तुला तुरूंगात पाठवू शकते'

By अमित इंगोले | Updated: November 2, 2020 11:01 IST

आता कंगनाने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या त्या व्हिडीओवर रिअ‍ॅक्शन दिली आहे ज्यात त्याने बीएमसीकडून कंगनाचं ऑफिस तोडण्याबाबत चर्चा केली.

अभिनेत्री कंगना रणौत आजकाल सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव आहे आणि जास्तीत जास्त प्रकरणांवर आपल्या ट्विटर अकाउंटवर रिअ‍ॅक्शन देते. आता कंगनाने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या त्या व्हिडीओवर रिअ‍ॅक्शन दिली आहे ज्यात त्याने बीएमसीकडून कंगनाचं ऑफिस तोडण्याबाबत चर्चा केली. कंगनाने ध्रुव राठीवर आरोप लावला आहे की, त्याने पैसे घेऊन व्हिडीओ तयार केला आहे.

एका जर्नलिस्ट फिल्ममेकरने एक ट्विट केलं होतं. ज्यात त्याने लिहिलं होतं की, ध्रुव राठीचं नाव न घेता लिहिलं होतं की, एका प्रसिद्ध यूट्यूबरने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर त्यांचा परिवाराची भूमिका आणि कंगनाला टार्गेट करणारे व्हिडीओ बनवण्यासाठी ६५ लाख रूपये घेतले आहे. कंगनाने या ट्विटवर रिअ‍ॅक्ट करत लिहिले की, या व्यक्तीला व्हिडीओ बनवण्यासाठी पैसे मिळतात. माझ्या घराबाबत मिळालेल्या बीएमसी नोटीसबाबत व्हिडीओत खोटं बोलण्यासाठी ती त्याला (राठी) तुरूंगात पाठवू शकते. यासाठी त्याला ६० लाख रूपये मिळाले होते. कंगनाने पुढे लिहिले की, सरकारचा पाठिंबा आणि पैसा मिळाल्याशिवाय एखादी व्यक्ती कायद्याच्या प्रक्रियेवर अशाप्रकारे खुलेआम खोटं का बोलेल. (जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली)

आधी फिल्ममेकरच्या ट्विटवर रिअ‍ॅक्ट करताना ध्रुव राठीने लिहिले होते की, 'माझ्याबाबतची ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. पहिला मुद्दा म्हणजे मला कंगनावर व्हिडीओ करण्यासाठी कुणीही पैसा दिला नाही. दुसरा मुद्दा मी सुशांत सिंह राजपूतवर कोणताही व्हिडीओ करण्याचं प्लॅनिंग करत नाहीये आणि तिसरा मुद्दा जर माझी स्पॉन्सरिंग फी ३० लाख रूपये असती तर मी किती श्रीमंत असतो'. (कंगना रणौतने पुन्हा करण जोहरवर केला हल्ला, प्रॉडक्शन टीमने गोव्यात केला होता कचरा)

असेही सांगितले जात आहे की, ध्रुव राठीने त्याच्या एका जुन्या व्हिडीओत दावा केला होता की, कंगनाला बेकायदेशीर बांधकामासाठी बीएमसीने २०१८ मध्ये नोटीस पाठवली होती. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसोशल मीडिया