Join us

कंगणा रनौतने सिनेमाच्या सेटवर केली रंगाची उधळण, पळवून पळवून क्रू मेंबर्सना रंगवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:30 IST

Kangana Ranaut : आज कंगणा रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  ज्यात ती तिच्या सिनेमाच्या सेटवरील लोकांसोबत रंग खेळताना दिसत आहे.

Kangana Ranaut : देशात सध्या सगळीकडे होळी साजरी केली जात आहे. बॉलिवूडमधील कलाकारही रंगाची उधळण करत आहेत. काल त्यांनी त्यांचे रंग खेळण्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आजही ते व्हिडीओ शेअर करत आहेत. काल कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, सलमान खान, भूमि पेडनेकर यांनी होळीचे फोटो शेअर केले होते. त्यांनी फॅन्सनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या. आज कंगणा रनौतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  ज्यात ती तिच्या सिनेमाच्या सेटवरील लोकांसोबत रंग खेळताना दिसत आहे.

फॅशन डिझायनर नीता लुल्लाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कंगणाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कंगणा व्हाईट सलवार सूटमध्ये आहे आणि तिच्या हातात रंगाची प्लेट आहे. कंगणा धावून धावून सगळ्यांना रंग लावत आहे. 

'चंद्रमुखी' सिनेमाच्या सेटवर होळी साजरी करण्यात आली. नीता लुल्लाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, "चंद्रमुखी 2 च्या सेटवर खूप प्रेम, आनंद आणि मस्ती करत आहे".

नीता लुल्लाच्या या व्हिडिओवर फॅन्सच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, कंगणाचा फेक शो. तर एकाने लिहिलं की, याला म्हणतात खरी होळी. एकाने लिहिलं की, कंगणा पण मस्ती करते का.

टॅग्स :कंगना राणौतहोळी 2023बॉलिवूड