Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर पल यहा जी भर जियो...! 'कल हो ना हो' पुन्हा रिलीज होणार, 'या' तारखेला येतोय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:31 IST

जुन्या सिनेमांच्या रि रिलीजचा धडाकाच सुरु आहे.

सध्या अनेक जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. 'रॉकस्टार', 'करण अर्जुन', 'जब वी मेट' यासारखे सुपरहिट सिनेमे रिलीज झाले. आपले आवडते चित्रपट इतक्या वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. या सिनेमांच्या यादीत आता 'कल हो ना हो' चाही समावेश झाला आहे. शाहरुख खानचा 'कल हो ना हो' पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

जुन्या सिनेमांच्या रि रिलीजचा धडाकाच सुरु आहे. २००३ साली आलेला 'कल ना हो' आठवत असेलच. शाहरुख खान, प्रिती झिंटा, सैफ अली खान यांची सिनेमात मुख्य भूमिका होती. सिनेमाची गोष्ट, यातील गाणी तर प्रचंड हिट झाली. सोनू निगमने गायलेलं सिनेमाचं टायटल साँगही आजही ठिकठिकाणी ऐकलं जातं. सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता तब्बल २१ वर्षांनी सिनेमा पुन्हा रिलीज होत आहे. १५ नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर भेटीला येत आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने ट्वीट करत ही गुडन्यूज दिली आहे. 'लाल अब सब के दिल का हाल है, होनेवाला अब कमाल है' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

'कल हो ना हो' सिनेमाला गेल्या वर्षी २० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त करण जोहरने सिनेमाच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. निखिल अडवाणीने सिनेमा दिग्दर्शित केला होता.  

टॅग्स :शाहरुख खानप्रीती झिंटासैफ अली खान बॉलिवूडसिनेमा